Fertilizer Supply : राजर्षी शाहू फाउंडेशनच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना थेट खत पुरवठा

Sowing Festival : ‘वन बुलडाणा मिशन’ अंतर्गत रविवारी (ता. ७) जिल्ह्यातील रुईखेड टेकाळे व खुपगाव येथे पेरणी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
Fertilizer Supply
Fertilizer SupplyAgrowon

Buldana News : ‘वन बुलडाणा मिशन’ अंतर्गत रविवारी (ता. ७) जिल्ह्यातील रुईखेड टेकाळे व खुपगाव येथे पेरणी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्षे आहे.

राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी ‘वन बुलडाणा मिशन’ ची स्थापना केली आहे. ही एक लोकचळवळ आहे. याअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव काम करण्यात येणार आहे.

Fertilizer Supply
Eknath Shinde : मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांकडून जाणूण घेणार शेतीचे प्रश्‍न

शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, सैनिक, उद्योजक, महिला बचतगट अशा सर्वच घटकांसाठी ही लोकचळवळ काम करणार आहे. दरम्यान रविवारी सकाळी वन बुलडाणा मिशन अंतर्गत रुईखेड टेकाळे, खुपगाव येथे पेरणी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना मूळ किंमतीत थेट बांधावर खतांचा पुरवठा करण्यास सुरवात करण्यात आली.

यावेळी साळूभाऊ उबरहंडे, बबनराव टेकाळे, शेषराव टेकाळे, साहेबराव टेकाळे, वासुदेव टेकाळे, तोताराम टेकाळे, राजू टेकाळे, नंदाजी टेकाळे, गजानन टेकाळे, बाळासाहेब देशमुख, प्रल्हाद टेकाळे, गोविंद देशमुख, मदन टेकाळे, गजानन उबरहंडे, गोकुळ टेकाळे, मधुकर टेकाळे, अंबादास टेकाळे, शरद उबरहंडे, विजय टेकाळे, बंडू टेकाळे, गणेश टेकाळे, अनिल टेकाळे, भागवत टेकाळे आदींची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com