
Parbhani Rabi Crop Loan : जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) ३१जानेवारी अखेर पर्यंत एकूण ५८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ४६४ कोटी १६ लाख रुपये (७४.२९ टक्के) पीककर्जवाटप (Crop Loan) झाले आहे.
त्यात ५ हजार ९६५ शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ६७ कोटी ३० लाख रुपये नवीन पीककर्ज (Crop Loan Allocation) आणि ५२ हजार ९२१ शेतकऱ्यांनी ३९६ कोटी ३६ लाख रुपयाच्या नूतनीकरण केलेल्या कर्जाचा समावेश आहे. राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज वाटपात आघाडीवर आहेत तर खासगी बँकांचे कर्ज वाटप संथ गतीने सुरु आहे.
परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.
त्यात राष्ट्रीयकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खाजही बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.
३१जानेवारी अखेर राष्ट्रीयकृत बँकांनी ३० हजार ४८८ शेतकऱ्यांना २९८ कोटी ९१ लाख रुपये (८२.६३ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४८ कोटी ६ लाख रुपये, जिल्हा बँकेने २२ हजार २७० शेतकऱ्यांना १०२ कोटी रुपये (७९.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
रब्बी पीककर्ज वाटप स्थिती ३१ जानेवारी अखेरपर्यंत (कोटी रुपये)
बँक - उद्दिष्ट - वाटप रक्कम - शेतकरी संख्या - टक्केवारी
भारतीय स्टेट बँक - २३१.५८- २६६.०८- २७५२८- ११४.९०
महाराष्ट्र ग्रामीण बँक - ८६.९५- ४८.०६ - ५१२९ - ५५.२७
जि.म.सहकारी बँक - १२९.१८- १०२.४३ - २२२७० - ७९.२९
बँक ऑफ बडोदा- २६.६९ - ७.२४- ७९४ - २७.१३
बँक ऑफ इंडिया - ४.८० - १.२७ - १०२ - २६.४६
बँक ऑफ महाराष्ट्रा - ३२.७६ - १४.६३ - ११७२ - ४४.६६
कॅनरा बँक - १९.१९ - ४.९४ - ४४२ - २५.७४
सेंट्रल बँक ऑफ इंडिया - ४.९० - १०५ - ११० - २१.४३
इंडियन बँक - ९.७८ - १.५२ - १३९ - १५.५४
इंडियन ओव्हरसीज बँक - ४.२१ - ०.७५ - ५८ - १७.८१
पंजाब नॅशनल बँक - ४.३९- ०.८० - ७३ - १८.२२
युको बँक - ९.५८ - ०.२० - १७ - २.०९
युनियन बँक ऑफ इंडिया - १३.८५ - ०.४३ - ५३ - ३.१०
अॅक्सिस बँक - ५.०७ - ०.६१- १४ - १२.०३
एचडीएफसी बँक - १५.४७ - २.९० - १४७ - १८.७५
आयसीआयसी बँक - १२.२४ - १०.३० - ६८३ - ८४.१५
आयडीबीआय बँक - १४.१६ - ०.९५ - १५५ - ६.७१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.