
Buldana News : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक (Grampanchyat Election) लढलेल्या व वेळेत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या सुमारे ६९० जणावर गंडांतर आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड (Collector Dr. h. P. Tummod) यांनी याबाबत नुकताच आदेश पारीत केला असून या उमेदवारांना आता पुढील पाच वर्षे कुठलीही निवडणूकसुद्धा लढवता येणार नाही. या निर्णयाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सन २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण २९२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या.
या ग्रामपंचायतीमध्ये ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढविलेली अशा उमेदवारांनी निवडणूक खर्च ३० दिवसांमध्ये सादर करणे बंधनकारक होते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण ६९० उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारीला काढलेल्या आदेशानुसार या दिनांकापासुन पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यासाठी संबंधितांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
यामध्ये सर्वाधिक १४६ सदस्य हे लोणार तालुक्यातील आहेत. यानंतर सिंदखेडराजामध्ये १३३ सदस्यांचा समावेश आहे.
बुलडाणा तालुक्यात ५६, चिखली २७, देऊळगावराजा ६५, मेहकर ६९, जळगाव जामोद १३, संग्रामपूर ३९, नांदुरा ४९, मोताळा २८, मलकापूर १६, खामगाव ४३ आणि सर्वात
कमी ६ सदस्य हे शेगाव तालुक्यातील आहेत. अशा प्रकारे ६९० सदस्यांचे पद निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने गेले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.