Agricultural Festival : नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सव

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Nanded News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या (Marathwada Mukatisangram) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) २०२३ चे औचित्य साधून कृषी विभाग (Agriculture Department) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचे (Agricultural Festival) आयोजन एक मार्च ते पाच मार्च या कालावधीत करण्यात आले आहे.

या महोत्सवास नागरिकांनी भेट देऊन जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारख्या पिकांचा समावेश आहे.

पिकाचे आहारामध्ये महत्त्व कळावे यासाठी कृषी महोत्सवात चर्चासत्र, पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Agriculture Department
Millet Mahotsav : तृणधान्याचा प्रसार झाल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव; मिलेट महोत्सवात आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे प्रतिपादन; तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात

याचबरोबर याचा आहारामध्ये समावेश व्हावा यासाठी विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला गटांचा सक्रिया सहभाग यात राहणार आहे.

महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, हरभराडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रिय उत्पादने (गूळ, हळद पावडर, डाळी) तसेच नावीन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचत गटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी) टरबूज, खरबूज इत्यादी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

सेंद्रिय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फुलभाज्या व रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस, तिळाचे तेल, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

Agriculture Department
Millet Year 2023 : पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सोलापुरात आज मिलेट दौड

दोनशे स्टॉलचे नियोजन

हा महोत्सवाचे आयोजन सकाळी दहा ते सायंकाळी आठपर्यंत नवा मोंढा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाचे स्टॉल, विविध कृषी निगडित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषीसंलग्न शासकीय विभागाचे स्टॉल असे एकूण दोनशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध विषयांचे चर्चासत्र, खरेदी -विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com