Pearl Pop : तुम्हाला बाजरीचे पर्लपॉप माहिती आहेत का?

बाजरीचा आहारातील वापर वाढावा यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृह विज्ञान विभागाने पर्ल पॉप या पदार्थाची निर्मिती केलीय.
Bajara
BajaraAgrowon

संयुक्त राष्ट्र संघान २०२३ हे वर्ष पौष्टिक भरडधान्य वर्ष (Millet year) म्हणून घोषित केलंय. भरडधान्यांच (Millets) उत्पादन वाढाव तसच त्यांचा मानवी आहारात वापर वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे.

त्यामुळे जगभरात भरडधान्याच आहारातील महत्व तसंच लागवडीविषय़ी जनजागृती केली जात आहे. भरडधान्यापासून विविध पदार्थ तयार करुन आहारात जास्तित जास्त भरडधान्याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भरडधान्यात समाविष्ट होणाऱ्या विविध धान्यापैकी बाजरी (Bajara) हे महत्वाच धान्य आहे. बाजरी हा लोहाचा उत्तम स्त्रोत आहे.

त्यामुळे बाजरीचा आहारातील वापर वाढावा यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृह विज्ञान विभागाने पर्ल पॉप या पदार्थाची निर्मिती केलीय. 

Bajara
Red Radish : तुम्हाला लाल मुळा माहिती आहे का?

भारतात रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळं होणाऱ्या अॅनिमिया आजाराच प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये लहान मुलं, तरुण मुली तसच गरोदर स्त्रिया आणि वृद्धांच प्रमाण जास्त आहे.

लोहाची गरज पूर्ण करण्यासाठी स्थानिक उपलब्ध, स्वस्त आणि लोहसमृद्ध पदार्थांचा वापर करुन बाजरीच्या लाह्यांपासून पर्ल पॉप हा अल्पोपहाराचा पदार्थ लोह समृद्ध पदार्थ म्हणून विकसीत करण्यात आला.

बाजरीच्या लाह्याचा चिवडा तयार करण्यासाठी प्रथम बाजरी निवडून स्वच्छ करावी. नंतर पाण्याने ओलसर करावी व भट्टीतून लाह्या तयार कराव्यात.

तेल, जीरे, कढीपत्ता, हळद, हिंग आणि डाळे यांची फोडणी करावी आणि तयार फोडणीमध्ये बाजरीच्या लाह्या घालाव्यात. चवीपुरत मीठ घालाव.

तयार चीवड्यामध्ये सुकविलेल्या राजगीऱ्याच्या पानांची पावडर भुरभुरावी. हा बाजरीचा चिवडा लोहयुक्त पदार्थ आहे. यालाच पर्ल पॉप असे नाविन्यपूर्ण नाव देण्यात आले.  

Bajara
तुम्हाला बायोकॅप्सूल माहिती आहेत?

प्रती १०० ग्रॅम चिवड्यामधून १९.१० मिलीग्रॅम लोह, १३.५६ ग्रॅम प्रथिने, १३२ मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळत.

दररोज ५० ग्रॅम चिवडा आहारातून घेतल्यास रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. याशिवाय शरिराची एक तृतीय अंश लोहाची गरज भागते.

हा चिवडा दोन महिन्यापर्यंत टिकतो. चिवडा बनविण्याची पद्धत सोपी असल्यामुळ घरगुती स्तरावर तयार करता येतो.

त्यामुळे असा चीवडा बनवून स्थानिक बचत गट तसंच महिलांसाठी चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com