स्त्री सन्मानाकडे दुर्लक्ष नको : पोपटराव पवार

संदीप काळे यांच्या ‘वूमन पॉवर’ पुस्तकाचे तीन भाषेत प्रकाशन
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

पुणे ः ‘‘कुटुंब सक्षम राहण्यासाठी आरोग्यदायी स्वयंपाक घर असणे आवश्यक आहे. त्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज असून मुलांच्या सकस आहाराकडे (Nutritious Diet) लक्ष दिले पाहिजे. स्त्री सन्मानाकडे (Women Dignity) दुर्लक्ष करून चालणार नाही,’’ अशा शब्दांत भावना व्यक्त करत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

संपादक, लेखक, संघटक, निवेदक असणाऱ्या संदीप काळे यांच्या ‘वूमन पॉवर - तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी’ या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन पार पडला. ज्या महिलांवर हे पुस्तक आहे त्यांना ‘महाराष्ट्राची सावित्री पुरस्कार’ देऊन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन आणि पुरस्कार पार पडला. यावेळी अभिनेते अजय पूरकर, लेखक व पत्रकार सुरेखा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोपटराव पवार अध्यक्षस्थानी होते.

Women Empowerment
Bribe : लाचखोर महिला तलाठीस तीन वर्षे सश्रम कारावास

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘स्त्री चा प्रवास हा तिच्या एकटीचा कधीच नसतो, तर तो समूहाच्या सहभागाचा असतो. यशाच्या मार्गावर जात असताना स्पर्धात्मक, द्वेष, मत्सर या भावनांना एखाद्या यशस्वी पुरुषांनासुद्धा सामोरे जावे लागलेले असते. परंतु स्त्री एखादी गोष्ट साध्य करते, त्यावेळी दुदैवाने अनेक स्त्रियांनासुद्धा ‘तिचे’ यश स्वीकारता, सांभाळता किंवा मनापासून त्याचा आनंद घेताना दिसून येत नाही. अशाप्रकारे अडथळे येऊन सुद्धा हसतमुखाने सगळ्या जगाला सामोरे जाण्यासाठी महिला पुढे जात आहेत. समाजाचे प्रागतिक स्वरूपाचे चित्र तुमच्या सगळ्यांच्या कामातून, प्रवासातून दिसते.’’

Women Empowerment
Katraj Milk : कात्रज मिल्क पार्लरसाठी महिला वितरकांना प्राधान्य

अभिनेते सिनेअभिनेते अजय पूरकर यावेळी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसंस्कार घराघरांत पोचविण्यासाठी आम्ही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करत आहोत. या चित्रपटांच्या माध्यमातून शिवसंस्कार महाराष्ट्रात आणि देशात जात आहेत.’’

लेखक व पत्रकार असणाऱ्या सुरेखा पवार म्हणाल्या, संदीपच्या लेखणीत सकारात्मक गोष्टींना आवर्जून स्थान दिले जाते. आत्मभानातून समाजातील प्रश्नांबाबत जाणीवा महिलांमध्ये जागृत आहेत. या जाणिवेतूनच समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महिला पुढे येत आहेत.

राजश्री महल्ले पाटील यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महिलांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा पुरस्कार काम करण्यासाठी ऊर्जा देणारा असेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण करंदीकर यांनी केले. पुण्याच्या मेरीगोल्ड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती.

स्त्रियांनी पुस्तकातून आदर्श घ्यावा ः काळे

‘वूमन पॉवर’ या पुस्तकाचे लेखक संदीप काळे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘वूमन पॉवर’ हे पुस्तकही वाचकांच्या मनात घर करेल. महाराष्ट्रातील स्त्रियांनी हे पुस्तक वाचून त्याप्रमाणे आदर्श घेत वेगळं काहीतरी काम करून दाखवायचं हे धाडस हे पुस्तक वाचल्या शिवाय कळणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com