Milkometer : वजनकाटे तपासणीचा सरकारचा निर्णय स्तुत्य: डॉ.अजित नवले

किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या पार्श्वभूमीवर दूधसंकलन केंद्रांवरील मिल्कोमीटर व वजनकाटे हे सरकारी यंत्रणेमार्फत तपासले पाहिजेत व त्यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.
 Milk
Milk Agrowon

Akole News : दूधसंकलन केंद्रांवर (Milk Collection Center) प्रमाणित मिल्कोमीटर बसविण्याचे व वजनकाटे आणि मिल्कोमीटरचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्वागत करत आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी सांगितले.

डॉ. नवले म्हणाले, की दूधसंकलन केंद्रांवर फॅट व एसएनएफ मोजताना मिल्कोमीटर यंत्राचे चुकीचे सेटिंग करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. वजन करतानाही शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून लुटले जाते.

 Milk
Milk Meter In Dairy : मिल्कोमीटर वापरणे झाले बंधनकारक; दूध उत्पादकांची लूट थांबणार?

किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या पार्श्वभूमीवर दूधसंकलन केंद्रांवरील मिल्कोमीटर व वजनकाटे हे सरकारी यंत्रणेमार्फत तपासले पाहिजेत व त्यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.

लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वजनकाटे व मिल्कोमीटर तपासणीबाबत निर्णय घेण्यात आला होता.

वजनकाटे वैधता प्रमाणीकरण विभाग व अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

यापुढे दूधसंकलन केंद्रांवर वापरण्यात येणारे मिल्कोमीटर व वजनकाटे यांची शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय शेतकरीहिताचा असल्याचे डॉ. नवले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com