Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon

Drip Irrigation Theft : सतर्कतेमुळे ठिबक चोरीचा प्रयत्न फसला

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. देविदास शेंडे यांच्या मुलगा स्वप्नील महाजन शेतात रखवालदाराच्या तपासासाठी गेले होते.

Nandurbar Chori News : तळोदा शहरापासून जवळच असलेल्या तलावडी शिवारातील शेतात पत्र्याच्या शेडवर ठेवलेल्या ठिबकच्या नळ्या गाडीत भरून चोरून (Drip Chori) नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्याने पकडले असून, अन्य तीन ते चार जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात (Taloda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी स्वप्नील महाजन यांच्या सतर्कतेचे व धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठार रस्त्यावरील तलावडी (ता. तळोदा) गावाजवळ निवृत्त तालुका आरोग्याधिकारी डॉ. देविदास शेंडे यांचे शेत आहे.

शेतात सिंचनासाठी ते नेहमी ठिबकचा वापर करीत असतात, मात्र सध्या त्यांनी शेतात गव्हाची लागवड केल्याने त्यांनी ठिबकच्या सर्व नळ्या काढून शेतातीलच पत्र्याच्या शेडवर ठेवल्या होत्या.

Drip Irrigation
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचे

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. देविदास शेंडे यांच्या मुलगा स्वप्नील महाजन शेतात रखवालदाराच्या तपासासाठी गेले होते.

त्यादरम्यान त्यांना शेतात चार ते पाच जण शेडवर ठेवलेल्या ठिबकच्या नळ्या (अंदाजित रक्कम ६० हजार रुपये) गाडीत (एमएस ०१, बीएच २३०४)मध्ये भरताना दिसून आले. त्यांनी लागलीच या बाबत आपल्या वडिलांना व मित्रांना फोनद्वारे कळविले.

स्वप्नील महाजन यांनी चोरांना हटकले असता, तीन ते चार जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांपैकी एकाने ठिबकच्या नळ्या भरलेली गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वप्नील महाजन यांनी धाडस दाखवत शिताफीने गाडीची चावी काढून घेत त्या चोराला पकडले.

तेवढ्यात घटनास्थळी त्यांचे मित्र व नातेवाईकदेखील पोहोचले. त्यानंतर चोराला पोलिस ठाण्यात हजर करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित हरीश कांतिलाल गोसावी याच्यासह अन्य तीन साथीदार (नाव-गाव माहीत नाही) यांच्याविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com