मालेगाव तालुक्यात शेवगा लागवडी भुईसपाट

मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता.९) मालेगाव, चांदवड, नाशिक तालुक्याला तडाखा देत दाणादाण उडविली आहे.
मालेगाव तालुक्यात शेवगा लागवडी भुईसपाट
Drumstick CropAgrowon

नाशिक : मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rain) शुक्रवारी (ता.९) मालेगाव, चांदवड, नाशिक तालुक्याला तडाखा देत दाणादाण उडविली आहे. त्यामुळे शेवगा (Drumstick), भाजीपाला पिकांसह (Vegetable Crop) कांदाचाळींचे (Onion Storage) नुकसान झाले. तर नाशिक तालुक्यातील संसरी येथे वीज (Lightning) पडून महिलेचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह दुपारी ४ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये नाशिक, चांदवड, मालेगाव, सिन्नर व नांदगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी घरे व दुकानांचे पत्रे उडाले. मालेगाव तालुक्याच्या उत्तरेला वजीरखेडे, वडगाव, लेंडाणे, कुकाने, करंजगव्हाण परिसरात उन्हाळी बहारातील काढणीस आलेल्या शेवगा पिकासह कांदाचाळींचे मोठे नुकसान झाले.

सिन्नर तालुक्यातील अनेक गावांत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. उत्तर भागात जायगाव परिसरात शेतात पाणी साचले. तर पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वच महसूल मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर व देवळा तालुक्यात मध्यम हलका पाऊस झाला.

वीज पडून तिसरा मृत्यू

नांदगाव व सिन्नर तालुक्यात महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. तर संसरी येथे घराच्या पटांगणात अंगावर वीज कोसळल्याने सविता बाळासाहेब गोडसे (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

जिल्ह्यातील पाऊस

महसूल मंडळ...पाऊस (मिमी)

करंजगव्हाण...३७.५

झोडगे...१५.८

सायने...२२.५

जातेगाव...४६.३

चांदोरी...३७

चांदवड...५६.५

दीघवद...३३.३

वडाळी...२०

शिंदे...७८.५

देवळाली...३२ ८

माडसांगवी...२२.५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com