Dryland Farming : कोरडवाहू शेतीच शेतकऱ्यांना तारेल : देवळाणकर

कोरडवाहू शेती व्यवस्थित चालविण्यासाठी मूल्यसाखळी जिवंत करावी लागेल. त्यासाठी कृषी शिक्षण व जनजागृती हाती घ्यावी लागेल. शिवकाळात वखराच्या कुळवाच्या पासीने रान कसले जात होते.
Dryland Farming
Dryland FarmingAgrowon

राज्याच्या कोरडवाहू शेतीला (Dryland Farming) शिवकालाची भक्कम आणि यशस्वी परंपरा आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला नव्याने शिकवण्याची गरज नसून खरी आवश्यकता या शेतीचे सन्मानाने पुनरुज्जीवन (Agriculture Revival) करण्याची आहे.

कारण शेतकऱ्यांना तारण्याची क्षमता फलोत्पादनापेक्षाही (Horticulture) कोरडवाहू शेतीमध्येच जास्त आहे, असे ठाम मत कृषी तज्ज्ञ उदय देवळाणकर (Agriculture Expert Uday Deolankar) यांनी व्यक्त केले.

‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात दुसऱ्या (ता. १४) दिवशी ‘कोरडवाहू शेतीची नवी दिशा’ या विषयावरील चर्चासत्र अभ्यासपूर्ण ठरले. ‘इफ्को’ कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. एम. एस. पवार यांनी ‘नॅनो युरिया’वर माहिती दिली. या वेळी ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, कृषिरत्न विश्‍वासराव पाटील उपस्थित होते.

राज्यात कापूस, सोयाबीन, मका ही मुख्य कोरडवाहू पिके आहेत. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या पिकांची मूल्यसाखळी मात्र विकसित झालेली नाही. त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ होत नाही.

त्यामुळे कोरडवाहू पिकांसाठी अन्य पर्याय सुचविले जातात. शिवकालाचा अभ्यास केल्यास नागली, बाजरी, ज्वारी, वरई अशी आपली पिके होती. कोरडवाहू भागात दूधदुभते होते.

मध उत्पादन केले जायचे. शिवकालातील कोरडवाहू शेती व्यवस्था सुदृढ होती. त्यामुळेच गडकोटांवरदेखील या पिकांची कोठारं आणि तुपाच्या विहिरी होत्या.

ब्रिटिश काळात या पीक व्यवस्थेला धक्का लागला. त्यानंतर आजपर्यंत या पिकांना सन्मान मिळालेला नाही, असे निरीक्षण देवळाणकर यांनी नोंदविले.

Dryland Farming
Cold Weather : हवेतील गारव्यामुळे गव्हाचे पीक जोमात

“खरे तर आजच्या कमाईभिमुख राजकारणाने शेती धोरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मूळ कौशल्यदेखील बरबाद केले गेले. मूल्यसाखळीचे नियोजन केल्यास आजही कापूस हे कोरडवाहू शेतकऱ्यांचे उत्कर्षाचे साधन होऊ शकते.

कोरडवाहू शेती व्यवस्थित चालविण्यासाठी मूल्यसाखळी जिवंत करावी लागेल. त्यासाठी कृषी शिक्षण व जनजागृती हाती घ्यावी लागेल. शिवकाळात वखराच्या कुळवाच्या पासीने रान कसले जात होते.

पिकलेले धान्य आणि या पासीदेखील किल्ल्यांमधील तटबंदीच्या आत आणल्या जायच्या. युद्धकाळात धान्य वापरले जाई आणि लोखंडी पासे वितळून तलवारी केल्या जायच्या.

त्यामुळे आपली लढाऊ शेतकरी संस्कृती खूप शहाणी होती. त्याचे नाकारलेले शहाणपण पुनर्प्रस्थापित करण्याची गरज आहे असे आग्रही मत देवळाणकर यांनी व्यक्त केले.

नॅनो युरिया हाच पर्याय ः डॉ. पवार

‘इफ्को’चे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. पवार म्हणाले, की १९४७ मध्ये देशात केवळ दोन लाख टन खते वापरली जात होती. सध्या हा वापर ६६१ लाख टनांवर गेला आहे.

सेंद्रिय कर्ब घटल्याने खतांची कार्यक्षमताही घसरली आहे. देशात सध्या ३५० लाख टन युरिया वापरल्यामुळे दरवर्षी ७० हजार कोटी अनुदान वाटले जाते. मात्र कार्यक्षमता घटल्याने यातील ३५ हजार कोटी वाया जातात.

त्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होते आहे. त्यावर नॅनो युरियाचा वापर वाढविणे हाच उत्तम पर्याय आहे. सूत्रसंचालन ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले.

Dryland Farming
Weather Update: कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच | ॲग्रोवन

युवा शेतकऱ्यांचा गौरव

या चर्चासत्रात ज्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा ‘ॲग्रोवन’च्या वतीने गौरव करण्यात आला त्यांची नावे पुढीलप्रमाणे. ईश्‍वर शिवाजी सपकाळ (तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), संतोष आग्रे (बाभूळगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), बद्रिनाथ नलावडे (तुपेवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), अरविंद नरोडे (शिल्लेगाव, ता. गंगापूर), पार्वती सदाशिव गिते (देवगाव, ता. पैठण), श्रीराम सुभाष बनकर (शृंगारवाडी, ता. पैठण), रेखा प्रभाकर चव्हाण (गदाना, ता. खुलताबाद), आकाश रावसाहेब शेळके (वडाळा, ता. सिल्लोड), विश्‍वजित सूर्यवंशी (मुखपाठ, ता. सिल्लोड).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com