Vegetable Rate : हवामानामुळे भाजी दरात चढ-उतार

तुर्भे येथील एपीएमसी बाजारात ६६५ भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक झाली आहे.
Vegetable Rate
Vegetable RateAgrowon

Vashi Apmc : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bombay Agricultural Produce Market Committee) भाज्यांची आवक सध्यातरी स्थिर आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढू लागल्याने भाज्यांचे दरही आत्तापासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात गवार प्रतिकिलो ७० रुपयांवर पोहोचली असून टोमॅटो ४० रुपयांवरून २० रुपयांवर आले आहेत.

तुर्भे येथील एपीएमसी बाजारात ६६५ भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक झाली आहे. तर फळ बाजारात कलिंगड, काळी व हिरवी द्राक्षे, पर-राज्यातील सफरचंदाची दैनंदिन आवक देखील वाढली आहे.

अशातच फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्यासारखा पारा चढला असल्याने रात्री वाढणारी उष्णता आणि सकाळी हवेत असणारा गारवा याचा फटका नाशवंत भाज्यांना बसत असल्याने भाव वाढल्याची माहिती घाऊक भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

Vegetable Rate
Pune APMC Election : बाजार समिती निवडणुकांच्या मतदार याद्यांचा घोळ कायम

एपीएमसीच्या घाऊक बाजारात मेथी-१६ रुपये, कांदापात-१५ रुपये, शेपू-२० रुपये, शिमला मिरची -२५ रुपये, मटार-२५ रुपये, भेंडी- ४५ रुपये, गवार-७० रुपये,कोबी-१० रुपये, फ्लॉवर-१२ रुपये, टोमॅटो-१८ ते २० रुपये, कोथींबीर २० रुपये जुडीने विकली जात आहे.

महिनाभर हवामान बदलाची स्थिती अशीच राहिल्यानंतर उन्हाळ्यापूर्वीच भाज्यांच्या दरांमध्ये देखील अशाच प्रकारे चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च ते मे महिन्यात भाजीपाल्यांचे कमी उत्पादन घेतले जात असल्याने भाव वाढणार आहेत.
अशोक शेळके, व्यापारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com