पावसाअभावी पेरण्या,ऊस लागवडी खोळंबल्या

इंदापूर तालुक्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
पावसाअभावी पेरण्या,ऊस लागवडी खोळंबल्या
RainAgrowon

वडापुरी, जि. पुणे ः इंदापूर तालुक्यात पावसाने (Rain0 दडी मारल्यामुळे खरीप हंगाम (Kharif Season) लांबणीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जून महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्यांसह (Sowing) उसाच्या लागवडी (Sugarcane Cultivation) खोळंबल्या आहेत.

यावर्षी चांगला पाऊस पडेल या आशेवरती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी असलेली फण, पाळी, नांगरट इत्यादीची कामे पूर्णपणे करून ठेवली आहेत. परंतु पाऊस कधी पडेल याची वाट इंदापूर तालुक्यातील शेतकरी पाहत असताना दिसत आहे. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी व चारा पिकांसाठी शेतकऱ्यांनी शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत. तर उसाच्या लागवडीसाठी सरी काढून शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत. मात्र पाऊस कधी पडेल याची शेतकरी वाट पाहत बसले असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com