
Vashi News : वाढता उन्हाचा तडाखा आणि सोबत रमजान महिना सुरू असल्याने सध्या बाजारात फळांना विशेष मागणी आहे. त्यातही कलिंगड, पपई आणि टरबूज या फळांबरोबर आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारात दररोज ५० गाड्यांची आवक होत असल्याने बाजारालाही उठाव आल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात जागोजागी फळांचे रस, फळांचे सॅलड यांच्या गाड्या लागलेल्या दिसतात. घरी खाण्यासाठीही लोक फळांची खरेदी आवर्जून करतात.
त्यामुळे सध्या बाजारात फळांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीही फळांच्या किमती मात्र स्थिर आहेत. बाजारात फळांना चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
फळे नाशवंत असल्याने उन्हाळ्यात ती लवकर खराब होतात. त्यामुळे ती जास्त वेळ साठवून ठेवता येत नाहीत. परिणामी, मिळेल त्या किमतीत विकावी लागत असल्याने, फळांच्या किमती कमीच आहेत, अशी माहिती व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली आहे.
दिवसाला ५० गाड्यांची आवक
रमजान महिन्यात रोजे सोडण्यासाठी बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. त्यामुळे या रसदार फळांना मोठी मागणी आहे. म्हणूनच कलिंगड, पपई, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
कारण एरवी या फळांच्या १० ते १५ गाड्या दररोज बाजारात येत असतात. मात्र, सध्या ५० गाड्यांची आवक होत असल्याने महिनाभर फळांचा हंगाम असाच राहणार आहे.
तापमान वाढल्याने फळांच्या रस पिण्यालाही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे लिंबू पाणी, उसाच्या रसाला, कलिंगड-मोसंबीच्या रसाची मागणी वाढली आहे.
फळांचे सध्याचे दर
फळ - घाऊक- किरकोळ
पपई - १५ ते २०- ४० ते ४५
टरबूज - २० ते २५- ४० ते ५०
कलिंगड - १० ते १५- ४० ते ५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.