Neo-Liberals: दुटप्पी नवउदारमतवादी

भारत जे हे करतो ते बरोबर करतो याबद्दल दुमत असायचे कारण नाही. वातावरण बदल (Climate Change) बद्दल चर्चा करणाऱ्या जागतिक व्यासपीठांवर भारतासकट गरीब, विकसनशील देश काय भूमिका घेतात? अजून आमचा आर्थिक विकास व्हायचा आहे, आम्हाला ऊर्जा जाळावीच लागणार, त्यामुळे आम्हाला कन्सेशन द्या अशी बाजू ते मांडतात.
Neo-Liberals
Neo-LiberalsAgrowon

संजीव चांदोरकर

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅँकेने स्वतःच्या देशाच्या हितासाठी व्याजदर वाढ आणि इतर मौद्रिक धोरणे आखली आहेत त्यावर टीका करताना भारतीय रिझर्व्ह बँक, अर्थतज्ज्ञ, प्रवक्ते आवाहन करतात की भारतासारख्या गरीब / विकसनशील देशांवर, रुपयावर तुमच्या निर्णयाचे काय परिणाम हे लक्षात घ्या. भारत जे हे बोलतो ते बरोबर करतो याबद्दल दुमत असायचे कारण नाही.

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) व्यासपीठावर भारत नेहमीच आपल्या देशातील शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी, मच्छीमार , आपल्या देशातील गरिबांची संख्या व त्यांना रेशनवर कमी दरात द्यावे लागणारे अन्न-धान्य याची बाजू मांडत श्रीमंत देशांच्या , बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दडपणाला विरोध करतो.

भारत जे हे करतो ते बरोबर करतो याबद्दल दुमत असायचे कारण नाही. वातावरण बदल (क्लायमेट चेंज) बद्दल चर्चा करणाऱ्या जागतिक व्यासपीठांवर भारतासकट गरीब, विकसनशील देश काय भूमिका घेतात? अजून आमचा आर्थिक विकास व्हायचा आहे, आम्हाला ऊर्जा जाळावीच लागणार, त्यामुळे आम्हाला कन्सेशन द्या अशी बाजू ते मांडतात.

भारत जे हे बोलतो ते बरोबर करतो, त्याबद्दल दुमत असायचे कारण नाही.देशातील अभिजन वर्गाचा दुटप्पीपणा, बौद्धिक प्रामाणिकपणा पाहा. देशाच्या बाहेर आम्ही गरीब/ विकसनशील, अजून आमचे आर्थिक स्नायू पुरेसे बळकट झालेले नाहीत. आम्हाला तुमच्या बरोबर स्पर्धेत उतरायला अजून थोडा वेळ लागेल अशी भूमिका घेणारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर “आम्ही गरीब, विकसनशील देश आहोत” म्हणून कन्सेशन मागणारे भारतीय अभिजन / शासक वर्ग त्यांच्या देशात देखील जे `गरीब व विकसनशील` समाज घटक आहेत त्यांना `कन्सेशन` न देण्यासाठी सगळे वैचारिक, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कसब पणाला लावतात. निर्दयी होतात. आरक्षणाला विरोध , सर्व प्रकारच्या सबसिडीला विरोध , शासनाच्या लोककल्याणकारी असण्याला विरोध , मार्केटचा मंत्रजागर , स्पर्धेचे आंधळे समर्थन अशी ही यादी खूप वाढवता येईल.

या सुटेड बुटेड नवउदारमतवाद्यांना चालू / स्वार्थी म्हटले की ते पळूनच जातात. त्यांना जाऊदे पळून. गरीब / निम्न मध्यमवर्गातून आलेल्या, अजूनही ज्यांचे रक्ताचे नातेवाईक गरिबीत / खेडेगावात अमानवी आयुष्य जगत आहेत अशा नवउदारमतवादाच्या तरुण पाठीराख्यांना आवाहनः तुम्ही आमच्याकडे नका येऊ ; पण तुमच्या आर्थिक तत्त्वज्ञानातील फोलपणा , दुटप्पीपणा , भारतासारख्या देशातील कोट्यवधी गरिबांना त्याचा होणारा जाच याबद्दल स्वतःची स्वतंत्र बुद्धी वापरा.

कल्याणकारी राज्य

एकदा चंबळच्या दरोडेखोरांनी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलन संपल्यानंतर त्यांनी कवींना काहीबाही बक्षीसे दिली ; कवी देखील खूष झाले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. कवी काही अंतरावर गेल्यानंतर मागून घोड्यावर येणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांनी दिलेली बक्षिसेच नाहीतर कवींची काहीबाही चीजवस्तू देखील लुबाडली.

आता कवी बुचकळ्यात पडले . तुम्ही असे का वागता, विचारते झाले. दरोडेखोर विचारांनी प्रगल्भ आणि स्पष्ट होते “ आम्ही नागरिकांना / कवींना बक्षीसे देणे हे आमचे कर्तव्य समजतो पण लुबाडणे हा आमचा धंद्याचा भाग आहे , आमचा धर्म आहे. याचा संबंध सरकार नागरिकांसाठी अधूनमधून जाहीर करत असलेल्या टोकन कल्याणकारी योजना आणि विविध प्रकारच्या प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष कर लादणे याच्याशी लावू नये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com