Rabi Sowing : रब्बीतील १ लाख ८९ हजार ३५० हेक्टरची ई-पीकपाहणी

यंदाच्या (२०२२-२३) रब्बीतील १०० टक्के पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी करण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन दिवस विशेष मोहीम राबविली.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

E-Peek Pahani Parbhani : यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात २ लाख ९५ हजार ४६२ हेक्टरवर पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. तर गुरुवार (ता. १६) पर्यंत १ लाख २० हजार ३१ खातेदार शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ३५० हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी (E-Peek Pahani) केली आहे

यंदाचे ई-पीकपाहणी क्षेत्र रब्बीतील (Rabbi Season) अंतिम पेरणी क्षेत्रानुसार ६४.०८ टक्के आहे. यंदा एकूण खातेदार शेतकऱ्यांपैकी २४.०७ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी केली. गतवर्षीच्या तुलनेत ई-पीकपाहणी क्षेत्रात यंदा १ लाख ३७ हजार ४३९ हेक्टरने वाढ झाली.

यंदाच्या (२०२२-२३) रब्बीतील १०० टक्के पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी करण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन दिवस विशेष मोहीम राबविली. त्यानंतर ई-पीकपाहणी वाढ झाली आहे.

E Peek Pahani
E-Pik : नळेगावात तलाठ्याकडून ई-पीक पाहणी

रब्बी पीक पाहणीसाठी बुधवार (ता. १५) पर्यंत अंतिम मुदत होती. परंतु ई-पीकपाहणी बाबत असंख्य शेतकऱ्यांना माहिती नसणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, सर्व्हर डाउनची समस्या, तलाठ्यांची उदासीनता त्यामुळे रब्बीतील संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात शेती खातेदारांची संख्या ५ लाख ४८ हजार ५११ हेक्टर असून एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार ७११ हेक्टर आहे. यंदा ई-पीक अॅपद्वारे पीकपाहणीचे क्षेत्र १ लाख ८९ हजार ३५० हेक्टर आहे. चालू पड १ हजार ९० हेक्टर आहे.

पेरणी क्षेत्र आणि पड क्षेत्र मिळून १ लाख ९० हजार ४४१ हेक्टर क्षेत्र आहे. गतवर्षीच्या (२०२१-२२) रब्बीत परभणी जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार १४२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५१ हजार ९११.५२ हेक्टर (१९.१५ टक्के) क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली होती.

ई-पीकपाहणीचे महत्त्व....

ई-पीकपाहणी नोंदणी खातेदार शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे स्वतः केली असल्यामुळे, स्वयंप्रमाणित मानली जाते. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत शेतीमाल खरेदी-विक्री ई-पीक नोंदणीसाठी आवश्यक आहे.

याद्वारे शेतातील जल सिंचनाच्या स्रोताची नोंद ७/१२ वर केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेत अर्ज करणे सुलभ होते. बांधावरील झाडांची नोंद करण्याचीही सुविधा या ई-पीकपाहणी अॅपमध्ये उपलब्ध आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : राज्यात ८६ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी

रब्बी पेरणी, ई-पीकपाहणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) गुरुवार ता. १६ पर्यंत

तालुका - पेरणी क्षेत्र - ई-पीकपाहणी क्षेत्र - शेतकरी संख्या

परभणी- ५६६४० २८५७४ १८०८७

जिंतूर- ६०००१ ३९७०५ २५६१०

सेलू - ३३३०८ २१०४१ १४१५४

मानवत- २००६९ १५४३६ १०१४६

पाथरी - १८२४८ १२३८३ ८३४७

सोनपेठ - १५८६४ १२९९१ ९०३९

गंगाखेड - ३२६५८ २०३५६ १४९५८

पालम - २१३७६ १४३३२ ११८६०

पूर्णा - ३७२९७ २४५२८ १९८३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com