निरोगी जीवनासाठी घ्या पोषक आहार

आपल्या देशामध्ये कुपोषणामुळे होणारे आजार शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये पाहायला मिळतात. चुकीच्या पद्धतीने घेतला जाणारा आहारामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. यासाठी योग्य पोषण आहार नियमित आणि योग्य वेळी मिळणे गरजेचे असते.
Healthy Diet
Healthy Diet Agrowon

आपल्या देशामध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१ ते ७ सप्टेंबर) राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) म्हणून साजरा केला जातो. निरोगी जीवनशैली (Healthy Lifestyle) टिकवून ठेवण्यासाठी योग्य पोषणमूल्य असलेला आहार (Nutritious Diet) गरजेचा आहे. या आहाराच्या पद्धतीचे मूल्य आणि असणारे पोषण घटक याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी कार्य केले जाते. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे, आपला आहार पोषक असावा हाच या सप्ताहचा उद्देश आहे.

राष्ट्रीय पोषण सप्ताहाची गरज का?

आपल्या देशामध्ये कुपोषणामुळे होणारे आजार शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये पाहायला मिळतात. चुकीच्या पद्धतीने घेतला जाणारा आहारामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. यासाठी योग्य पोषण आहार नियमित आणि योग्य वेळी मिळणे गरजेचे असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी पोषण आहार सप्ताहाची गरज आहे.

Healthy Diet
Healthy Coconut : आरोग्यदायी नारळ

राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास

नॅशनल न्यूट्रिशन वीकला सुरुवात अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या सदस्यांनी १९७५ मध्ये केली होती. ज्याला आता पोषण आणि आहारशास्त्र अकादमी म्हणून ओळखले जाते. चांगल्या पोषणाचे मूल्य आणि सक्रिय जीवनशैलीची गरज याबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आठवडा साजरा केला जाऊ लागला. जनतेकडूनच्या सकारात्मक स्वागतामुळे १९८० मध्ये या सप्ताहाचा उत्सव संपूर्ण महिनाभर राबविण्यात आला. भारतात पहिल्यांदा १९८२ मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात आला, जेव्हा सरकारने देशातील जनतेला माहिती देण्यासाठी आणि त्यांना दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी पोषक आहाराकडे प्रवृत्त करण्यासाठी एक मोहीम सुरू केली.

राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२२ ची थीम

राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम भारत सरकार दरवर्षी जाहीर करते. २०२१ मध्ये, भारतातील पोषण सप्ताहाची थीम होती - फीडिंग स्मार्ट राइट फ्रॉम स्टार्ट तर राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२२ ची थीम आहे ‘सेलिब्रेट अ वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स.’ जगभरातील सांस्कृतिक खाद्यपदार्थ हे चवींची विविधता दाखवतात. हे निरोगी, टिकाऊ खाण्याच्या पद्धतींचा भाग आहेत. शाश्‍वत पोषण म्हणजे पौष्टिक, परवडणारे आणि सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहेत याची खात्री करणे तसेच पर्यावरणीय संसाधनांचे जतन करणे आणि स्थानिक समुदायांना समर्थन देणे हाही या सप्ताहामागचा उद्देश आहे. फळे, भाज्या, धान्य, प्रथिने आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असलेल्या निरोगी खाण्याच्या पद्धती जगभरातील लोकसंख्येच्या दीर्घकालीन आरोग्य आणि निरोगी जीवनास समर्थन देतात. स्थानिक पदार्थांचा आपल्या आहारात जास्तीत जास्त कसा समावेश करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. हेच पदार्थ आपल्या शरीराचे योग्य पोषण करण्यास मदत करीत असतात. आपल्या स्थानिक पदार्थांचा आणि शारीरिक जडणघडणीचा प्रत्यक्ष संबंध आपल्या भौगोलिक वातावरणाशी असतो. त्यामुळे स्थानिक शेती, धान्य आणि खाद्य संस्कृती जपली पाहिजे.

कुपोषण आणि अतिपोषण कुपोषण

पुरेसा व योग्य पोषक आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात. त्या व्यक्तीला कुपोषित म्हणतात. कुपोषण म्हणजे आजार नाही. परंतु अयोग्य आहार, उपासमार, जीवनसत्त्वांचा अभाव यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. कुपोषण फक्त मुलांमध्येच पाहायला मिळते असे नाही, अनेक तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये देखील कुपोषण पाहायला मिळते. गरोदर महिलांमध्ये योग्य आहार न मिळाल्याने गरोदर महिला तसेच होणारे बाळ दोघांना कुपोषण होण्याचा धोका असतो. कुपोषण हे अनेक आजारांना प्रत्यक्षरीत्या जबाबदार असते. संपूर्ण जगभरात आढळणारा हा सर्वसाधारण आजार म्हणजे Kwashiorkor - क्वाशियोरकोर प्रोटीनच्या अभावामुळे, Marasmus - मारास्मस प्रोटीन कर्बोदके आणि फॅट यांच्या अभावामुळे, जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावामुळे येणारे अंधत्व, रक्तक्षय Anaemia - अनिमिया, Beriberi - बेरीबेरी प्रतिबंधासाठी आणि आरोग्याच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारचे पोषण अत्यावश्यक ठरते.

अतिपोषण

जेव्हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पोषक तत्त्व मिळतात. यामुळे देखील शरीर अनेक आजारास निमंत्रण देते. अतिपोषण हा कुपोषणाचा एक प्रकार आहे. असंतुलित पोषण (पोषक) तत्त्वांच्या अतिसेवनामुळे उद्‍भवते. ज्यामुळे शरीरात चरबी जमा होते आणि आरोग्य बिघडते. जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक विषमता जास्त आहे अशा देशामध्ये अतिपोषणाचे संकट वाढत्या प्रमाणात नोंदवले गेले आहे.

योग्य पोषणासाठी आवश्यक घटक

आपल्या आहारात धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तुपातून पोषणासाठीचे आवश्यक घटक मिळतील. अन्न खाताना ते फक्त पोट भरणारे असू नये तर शरीर, मन, बुद्धी हे सर्व पोसणारे हवे. ताजे अन्न, ताजा भाजीपाला हे फक्त पोट भरण्यासाठी नसून शरीराला ऊर्जा देण्यासाठी आवश्यक आहे. नियमित चांगली भूक लागली असताना जेवण केल्यास शरीराचे योग्य पोषण होण्यास मदत मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com