Financial Illiteracy : अर्थ निरक्षरता आणि रिझर्व्ह बॅंकेचा संबंध ठाऊक आहे का?

बँकांकडे कोट्यवधी बचत / मुदत ठेवी खाती उघडली जातात. ती सर्वच्या सर्व नियमितपणे वापरली जातात असे नव्हे. त्यातील काही खाती काही वर्षांनंतर अनाथ (अनक्लेम्ड) होतात. कोणीच खातेदार पडून राहिलेले पैसे काढायला फिरकतच नाही.
Economy
EconomyAgrowon

बँकांकडे कोट्यवधी बचत / मुदत ठेवी खाती (Fixed Deposit) उघडली जातात. ती सर्वच्या सर्व नियमितपणे वापरली जातात असे नव्हे. त्यातील काही खाती काही वर्षांनंतर अनाथ (अनक्लेम्ड) होतात. कोणीच खातेदार पडून राहिलेले पैसे काढायला फिरकतच नाही. आरबीआयच्या नियामुसार जो अकाउंट १० वर्षे विनावापर राहील त्या खात्यातील पैसे आरबीआयमधील (RBI) एका खास अकाउंटमध्ये वर्ग करावे लागतात. आरबीआयकडील हा अकाउंट अर्थसाक्षरता (Financial Literacy) वाढवण्यासाठी वापरला जाणार असतो. मार्च २०२० च्या शेवटी या अकाउंटमध्ये देशभरातून ३३,००० कोटी रुपये जमा झाले होते. मार्च २०२१ च्या शेवटी ते ३९,००० कोटी रुपये झाले.

Economy
Economy : प्रस्थापित व्यवस्थेची डोकेदुखी ठरलेली माणसे

म्हणजे फक्त १२ महिन्यांत ६००० कोटी रुपयांचे बचत / मुदत खाती इनऑपेरेशनल झाली. २०२०-२१ मध्ये अर्थसाक्षरतेसाठी या खास अकाउंटमधून फक्त १६४ कोटी रुपये खर्च केले गेले (स्रोत- वित्त राज्यमंत्र्यांनी संसदेत दिलेले उत्तर) उघड आहे हे ३९,००० कोटी रुपये मध्यमवर्ग / उच्च मध्यमवर्गातील कुटुंबांचे नाहीत. तर हे पैसे लाखो गरीब कुटुंबांचे आहेत; फक्त १२ महिन्यांत ६००० कोटी रुपये इनऑपरेशनल झाले. उघड आहे याचा संबंध लाखो कुटुंबाच्या अर्थ / वित्त निरक्षरतेशी आहे.

किती विरोधाभास आहे हा. अर्थ साक्षरता वाढवण्यासाठी आरबीआयकडे हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत; त्यातील फक्त अर्धा टक्का साक्षरता वाढवण्यासाठी खर्च होतात. निरक्षरता संपत नाही, आणि अनक्लेम्ड रकमा वाढत जातात, हा प्रश्‍न फक्त बँक खात्यातील अनक्लेम्ड खात्यांचा नाही. मायक्रो इन्शुरन्स, मायक्रो पेन्शन, म्युच्युअल फंड याचे जोरदार मार्केटिंग करून हजारो कोटी रुपये अर्थ निरक्षर नागरिकांकडून गोळा केले जातात.

इन्शुरन्स / पेन्शनच्या लॅप्सड पॉलिसीमध्ये अडकलेले पैसे असेच हजारो कोटींमध्ये आहेत. कोणत्याच सरकारला मूलभूत काम करायचे नाहीये; पोलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी गरिबांसाठी टोकनिझममध्ये सगळे मश्गूल आहेत.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक असून, टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com