Paddy Harvesting : भातकापणी, झोडणीत रमली रायगडमधील सुशिक्षित तरुण पिढी

जिल्ह्यात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
Rice Harvesting
Rice HarvestingAgrowon

पाली : जिल्ह्यात आता भातकापणीच्या (Paddy Harvesting ) कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा (Rain) फटका बसलेल्या भातशेतीतून (Paddy Farming) उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Rice Harvesting
Soybean Harvesting : बाजरी, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात

अशातच वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुणही प्रकर्षाने आहेत. या कामादरम्यान ही मंडळी अनेक गमतीजमती, गाणी, जेवण आदीची मजाही करत आहेत.

नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आले आहेत. सुशिक्षित तरुणांनाही शेतीत रस निर्माण होणे, हा कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल आहे. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये, यासाठी शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत.

Rice Harvesting
Rice Cultivation : १२ एकरात भाताच्या ५० वाणांची लागवड करणारा शेतकरी

अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटोपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करत आहेत. यामध्ये श्रम, वेळ व पैसा बचत होत आहे. मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत.

खळ्यांवर झोडणी

ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे.शेतीची सर्व कामे करतो. कापणीच्यावेळी काही शेतात पाणी साठलेले आहे, तर अनेक शेत खाडी, नदी व तळ्याच्या शेजारी आहेत. येथील ताजी मासळी पकडून मस्त कालवण बनवून अनेक जण ताव मारत आहे. याच दरम्यान सुख-दुखाची देवाण घेवाण सुरू असते. तसेच, काही जण लोकगीते सुद्धा म्हणत आहेत. शेतीचे काम करताना एकूणच सर्व धम्माल आणि मज्जा येते.

- ॲड. राकेश पाटील, तरुण शेतकरी, अलिबाग

दिवसेंदिवस वाढलेल्या महागाईमुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्याने घरातील कुटुंबातील आणि अन्य नातेवाईक कुटुंबांच्या मदतीने आळीपाळीने कापणी व झोडणीची कामे करत आहेत. या कामात सुशिक्षित तरुण व महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. यात समाधान मिळते.

- राम तुपे, सुशिक्षित शेतकरी, कोंडगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com