Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न : रोहित पवार

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लिंक लाइन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून, त्या माध्यमातून अनेक कामांना गतीदेखील मिळाली आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarAgrowon

Nagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील सामान्य नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना वेळोवेळी प्रयत्न करून नवीन वीज उपकेंद्र (Electricity Sub Station) तसेच लिंक लाइन याबाबत शासनस्तरावरून विविध मंजुऱ्या मिळवल्या होत्या.

त्यामुळे तालुक्यातील वीजप्रश्न सुटण्याला मदत होणार आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील घुमरी येथील २ कोटी २ लाख रुपये किमतीच्या ३३/११ केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले.

हे वीज उपकेंद्र झाल्यामुळे परिसरातील घुमरी, थेरगाव, निमगाव गांगर्डा, बेलगाव व नागमठाण या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार असून ६ गावांवर पूर्वी येणारा ताणदेखील पूर्णपणे कमी होणार आहे. सध्या पाच गावांत पूर्ण आणि उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.

MLA Rohit Pawar
Solar Power : छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘महावितरण’ला राष्ट्रीय पुरस्कार

आमदार रोहित पवार म्हणाले, ‘‘वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लिंक लाइन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून, त्या माध्यमातून अनेक कामांना गतीदेखील मिळाली आहे.

त्याचबरोबर राशीनमध्ये असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढवण्याची परवानगीही मिळवली आहे. ज्यामुळे उपकेंद्रावर आलेला ताण कमी होऊन अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होईल.

घुमरी येथे नवीन उपकेंद्राचे भूमिपूजन पार पडले असून दोन्ही तालुक्यांतील मिळून नायगाव, दिघोळ, चीलवडी व चौंडी येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी नायगाव उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन ते सुरू देखील झाले आहे. आणि इतर निविदा स्तरावर आहेत.

याशिवाय राशीन, मिरजगाव, कुळधरण, भांबोरा आणि खांडवी येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com