भोर तालुक्यात पर्यावरणपूरक पर्यटनासाठी प्रयत्न करणार

निसर्ग संपदेने नटलेल्या भोर तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीशिवाय पूरक व्यवसाय करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Supriya Sule
Supriya SuleAgrowon

भोर, जि. पुणे ः निसर्ग संपदेने नटलेल्या भोर (Natures Beauty) तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीशिवाय पूरक व्यवसाय (Agri Based Business) करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यटनासाठी (Eco Friendly Tourism) विशेष प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले.

Supriya Sule
Crop Damage : तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

जिल्ह्याला दोन महिन्यांपासून पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करणार आणि रस्ते व इतर विकासकामात कसूर ठेवणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणार असल्याचेही खासदार सुळे यांनी नमूद केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता.२२) तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आढावा बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या काही विभागांबद्दल नाराजी व्यक्त केली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे भोर आगार आणि महावितरणसंदर्भात जास्त तक्रारी होत्या.

Supriya Sule
Crop Damage : तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

तालुक्यातील धरणे, नेकलेस पॉइंट, गड-किल्ले अशा प्रकारची ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य असल्यामुळे पर्यटनाला चांगली संधी आहे. इकोफ्रेंडली पर्यटनासाठी शासनाच्या इको सेंन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे पालन करून योग्य प्रकारे पर्यटन व्यवसाय सुरू केल्यास रोजगाराच्या अनेक संधी सुरू होतील. पर्यटनात इच्छुकांना गाइड प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या तांदळासाठी व बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ सुरू करण्यात येणार आहे.

या आढावा बैठकीस प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहल देव आदींसह तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवानेते विक्रम खुटवड, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, नितीन धारणे, प्रकाश तनपुरे, मनोज खोपडे, वंदना धुमाळ, हसीना शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘एसटीच्या अडचणी सोडविण्याबाबत निर्णय घेणार’

नागरिकांना एसटीकडून योग्य सेवा मिळण्याबाबत आणि एसटीच्या अडचणी सोडविण्याबाबत पुढील आठवड्यात विशेष बैठका घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. नगरपालिकेला भरपूर निधी येऊनही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबतची माहिती घेऊन कामांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांनीच असल्याचेही सुळे यांनी नमूद केले. या आढावा बैठकीतील मुद्द्यांवर पुढील तीन महिन्यांनंतर पुन्हा फेरआढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com