Solapur Apmc Election Update : सोलापुरात आठ बाजार समित्यांसाठी चुरस वाढली

मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) १८ जागांसाठी अठराच अर्ज दाखल झाले.
Solapur APMC
Solapur APMC Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agriculture Produce Market Committee) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी चुरस वाढली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) जिल्ह्यातील आठही बाजार समित्यांतील संचालक मंडळाच्या १४४ जागांसाठी तब्बल ८२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अक्कलकोट बाजार समितीसाठी (Akkalkot Market Committee) १०६ अर्ज दाखल झाले. सांगोला बाजार समितीसाठी १३६, मोहोळ बाजार समितीसाठी (Mohol Market Committee) १८, अकलूज बाजार समितीसाठी ८१, कुर्डुवाडी बाजार समितीसाठी १४६, दुधनी बाजार समितीसाठी ७९, मंगळवेढा बाजार समितीसाठी १४५ आणि पंढरपूर बाजार समितीसाठी ११७ असे ८२८ अर्ज दाखल झाले.

Solapur APMC
Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी ४१३ अर्ज

विशेषतः सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वाधिक चुरस दिसत आहे, या मतदारसंघात तब्बल ४५६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघातून २९० अर्जाचा समावेश आहे.

यंदा किमान १० गुंठे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाही अर्ज भरता येणार आहे, असा शासन निर्णय झाला आहे, त्यामुळेही अर्ज वाढल्याचे सांगण्यात येते.

पंढरपूर, अकलूज, अक्कलकोटकडे लक्ष

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी आठ बाजार समित्यांपैकी मोहोळ बाजार समितीत १८ जागांसाठी १८ च अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे इथे माजी आमदार राजन पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले, पण पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि अकलूजमध्ये मोहिते पाटलांना हा प्रयत्न करता आला नाही.

दुसरीकडे अक्कलकोटमध्येही आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यातही संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या बाजार समित्यांकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Solapur APMC
Kolhapur Apmc Election : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीसाठी विक्रमी ७९३ अर्ज

मोहोळ बाजार समिती निवडणूक बिनविरोध

मोहोळ, जि. सोलापूर : मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) १८ जागांसाठी अठराच अर्ज दाखल झाले. त्यामुळे मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५४ मध्ये झाली आहे. स्थापनेपासून म्हणजे गेल्या ७५ वर्षांपासून बाजार समितीवर माजी आमदार राजन पाटील गटाचे वर्चस्व आहे. माजी आमदार पाटील यांच्या अगोदर त्यांचे वडील (स्व.) बाबूराव (अण्णा) पाटील यांचे वर्चस्व होते.

नवीन धोरणानुसार या निवडणुकीसाठी शेतकरी उमेदवारी अर्ज भरू शकत होते. मात्र, एकही शेतकरी अर्ज आलेला नाही. दरम्यान विरोधकांनीही या निवडणुकीत फारसा रस न दाखविल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. बाजार समितीसाठी निवडलेले सर्व अठराही चेहरे नवीन आहेत. त्यात दोन महिलांना संधी देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com