Sugar Factory Election : ‘वैद्यनाथ’ची निवडणूक घोषित

Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : बीड तालुक्यातील गोपीनाथगड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (ता. ९) घोषित करण्यात आला.
Sugar Factory
Sugar Factory Agrowon

Parali Election News : बीड तालुक्यातील गोपीनाथगड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (ता. ९) घोषित करण्यात आला. २१ जागेसाठी ११ जून रोजी मतदान होणार आहे.

Sugar Factory
Ghodganga Sugar Factory : घोडगंगा कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार

गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. यानंतर आजपर्यंत कायम कारखान्यावर दिवंगत गोपीनाथराव मुंडे व त्यांच्या पश्चात त्यांची कन्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड निवडणूक अधिकारी समृत जाधव यांनी मंगळवारी कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणूक घोषित केली. यामध्ये नामनिर्देशित पत्र दाखल करण्यासाठी बुधवार (ता.१०) ते मंगळवार (ता.१६) पर्यंत सकाळी ११ ते ३ यावेळेत मुदत असेल.

याच काळात जसे उमेदवारी अर्ज दाखल होतील त्या पद्धतीने नामनिर्देशित पत्राची सूची प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता.१७), उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १८ मे ते १ जूनपर्यंत मुदत असेल. मतदान ११ जूनला व १२ जूनला मतमोजणी होईल. ‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीनिमित्त मुंडे-बंधू भगिनी पुन्हा समोरासमोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com