APMC Election: राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर

बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ डिसेंबरअखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.
APMC
APMCAgrowon

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC Election) ३१ डिसेंबरअखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. या बाबतची निवडणूक प्रक्रिया (Election Process) बुधवार (ता. ७) पासून सुरू होत असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान (APMC Voting) २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणुकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने पूर्ण करून त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे.

APMC
Cotton Production: कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचणार?

बाजार समितीच्या निवडणुकीकरिता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवानाधारक व्यापारी, अडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफराबाद, भोकरदन, वसमत व धारूर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले.

APMC
Crop Advisory : भात, आंबा, काजू पिकाचे व्यवस्थापन

त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरू केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली आहे.

संभाव्य मतदार यादी कार्यक्रम
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवणे- २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरिता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- ३ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- ३ ते ३१ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- ७ डिसेंबर २०२२

APMC
Subsidized Fertilizer : अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास कारवाई

संभाव्य निवडणू‍क कार्यक्रम

- निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर करणे ः २३ डिसेंबर

- नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ः २३ ते २९ डिसेंबर

- नामनिर्देशनपत्रांची छाननी ः ३० डिसेंबर

- छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी ः २ जानेवारी

- उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी ः २ ते १६ जानेवारी

- उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करणे ः १७ जानेवारी

- मतदान ः २९ जानेवारी

- मतमोजणी, निकाल जाहीर ः ३० जानेवारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com