Agriculture Pump Electricity Supply : कोल्हापूर परिमंडळात १८ हजार शेतीपंपांना वीजजोडणी

शेतीपंप वीज जोडणीचा पेड पेडिंगचा प्रश्न मार्गी लावण्यात ‘महावतिरण’चे कोल्हापूर परिमंडळ राज्यात अग्रेसर ठरले आहे.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Electricity Irrigation Pump News : शेतीपंप वीज जोडणीचा पेड पेडिंगचा प्रश्न मार्गी लावण्यात ‘महावतिरण’चे कोल्हापूर परिमंडळ राज्यात अग्रेसर ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कोल्हापूर परिमंडळात तब्बल १८ हजार ८७२ शेतीपंपाना जोडण्या देऊन राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. सांगली जिल्ह्यात एका वर्षात ११ हजार ९१५ वीजजोडण्या दिल्या.

‘महावितरण’ने शेतीसाठी वीजपुरठ्यासाठी गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानुसार शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांचा वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यास ‘महावितरण’ने प्राधान्य दिले आहे.

शेतीपंप वीज जोडणीचा नियोजबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार आवश्यक निधीची उपलब्धता करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Agriculture Pump
Agriculture Electricity : ‘मुख्यमंत्री सौर कृषी’ टप्पा २ शेतकऱ्यांना वरदान ठरेल

सांगली मंडळात एका वर्षात तब्बल ११ हजार ९५७ शेतीपंपाना वीज जोडणी देण्यात आली. कवठे महांकाळ विभागात सर्वाधिक ४ हजार ४८४, विटा ४ हजार २०१, सांगली ग्रामीण २ हजार ६८, इस्लामपूर १ हजार १७८, सांगली शहर विभागात २६ शेतीपंपांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.

तर कोल्हापूर मंडळातील कोल्हापूर ग्रामीण विभाग क्र.२ मध्ये सर्वाधिक २१४५, कोल्हापूर ग्रामीण क्र. १ मध्ये १९६१, गडहिंग्लज १४२०, जयसिंगपूर ११४८, इचलकरंजी २१८ व कोल्हापूर शहर विभागात २३ अशा एकूण ६ हजार ९१५ शेतीपंपाना नवीन वीज जोडणी देण्यात आली.

मार्च २०२२ पूर्वीच्या पैसे भरून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर (४१३), सांगली (१६८२) जिल्ह्यांतील शेतीपंप वीजजोडण्या मे २०२३ अखेर आणि मार्च २०२० नंतरच्या पैसे भरून प्रलंबित कोल्हापूर (१०११), सांगली (२७३६) जिल्ह्यातील शेतीपंप वीज जोडण्या लवकर देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com