Budget Maharashtra 2023 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींना सरकारने लाभ दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
Indian Farmer
Indian FarmerAgrowonAgrowon

Maharashtra Budget - २०१७ मध्ये लागू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींना सरकारने लाभ दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत वेळेववर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेतर्गत १२.८४ लाख पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे.

तसेच या योजनेतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार ६८३ कोटी रुपये थेट जमा करण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध तरतूदीची घोषणा केली आहे.

तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सेंद्रिय शेती प्रोत्साहन कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यातही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्य सरकारने १ लाख कोटींची तरतूदची घोषणाही अर्थसंकल्पात केली आहे. पुढील ३ वर्षात २५ लाख हेक्टरवर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येणार आहे.

शेती आणि शेतकऱ्यांच्या शाश्वततेसाठी व समृद्धीसाठी राज्य सरकारचा भर असणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com