Bamboo Processing Industry : बांबू प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची मोठी संधी

आजरा पंचायत समिती सभागृहामध्ये स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसीटी), कोल्हापूरअंतर्गत बांबू प्रशिक्षणाला सुरुवात झाली. याचे उद्‍घाटन तहसीलदार अहिर यांच्या हस्ते झाले.
Bamboo Processing
Bamboo ProcessingAgrowon

Kolhapur News : बांबूपासून कलाकुसर, शोभेच्या वस्तू यांसह विविध वस्तूंची निर्मिती करण्याचे उद्योग सुरू आहेत. केंद्र व राज्य शासनही याला प्रोत्साहन देत आहे. भविष्यात बांबू प्रक्रिया उद्योगातून (Bamboo Processing Industry) रोजगाराची (Employment) मोठी संधी आहे.

त्यामुळे प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर (Tehsildar Vikas Ahir) यांनी केले.

आजरा पंचायत समिती सभागृहामध्ये स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसीटी), कोल्हापूरअंतर्गत बांबू प्रशिक्षणाला सुरुवात झाली. याचे उद्‍घाटन तहसीलदार अहिर यांच्या हस्ते झाले.

सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, ‘आरसीटी’चे संचालक के. के. उपाध्ये, तज्ज्ञ मार्गदर्शक एस. व्ही. हर्डीकर, ए. एच. जमादार उपस्थित होते.

Bamboo Processing
Bamboo Farming : बांबू शेती खरेच फायदेशीर ठरते का?

सहायक गटविकास अधिकारी पाटील म्हणाले, की आजरा तालुक्यात बांबूचे उत्पादन मोठे आहे. येथे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महिला बचत गटांना एकत्रित करून बांबू क्लस्टर तयार केले जाईल. त्यांनी बनवलेल्या वस्तूची विक्रीसाठी बचत भवनची इमारत खुली करणार आहे.

हर्डीकर म्हणाले, की महिला बचत गटांनी स्वावलंबन व स्वाभिमान शिकावा. विविध कौशल्य आत्मसात करून स्वतःचे व्यवसाय करावेत. बांबू प्रक्रिया उद्योगातून हे शक्य आहे.

नायब तहसीलदार कोळी, ‘आरसीटी’चे संचालक उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. बचत गटाच्या ४० महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

Bamboo Processing
Bamboo Farming : लातूर ग्रामीणमध्ये एक लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ

तालुका अभियान कक्षाचे प्रभाग समन्वयक एस. बी. कांबळे यांनी स्वागत केले. बॅंक सखी आरती भादवणकर यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला कांबळे यांनी आभार मानले.

प्रशिक्षण कार्यक्रम

आठ दिवस बांबू क्रॉप्टिंगचे कोअर ट्रेनिंग होईल. पाच दिवस सामान्य उद्योजकता विकास (एडीपी) अशी तेरा दिवसांची कार्यशाळा होईल. यासाठी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण कांबळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com