Organic Farming: आदिवासी शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार

अलस्वमित्र बोटॅनिकल कंपनीने दक्षिण भारतीय राज्यांत सेंद्रिय शेतीसाठी एनजीओच्या (स्वयंसेवी संस्था) मदतीने पुढाकार घेतला. दक्षिण भारतातील विविध राज्यांतील आदिवासी समूहाला सेंद्रिय बियाणे उपलब्ध करून देणे आणि त्यांचे सेंद्रिय उत्पादन विकत घेण्याचे दुहेरी काम या पुढाकारातून केले जात आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) आग्रह धरण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी काही योजना राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा, यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार केला जात आहे.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग अपेक्षित आहे. बंगळुरू येथील अलस्वमित्र बोटॅनिकल कंपनीने दक्षिण भारतीय राज्यांत सेंद्रिय शेतीसाठी एनजीओच्या (स्वयंसेवी संस्था) मदतीने असाच पुढाकार घेतला. दक्षिण भारतातील विविध राज्यांतील आदिवासी समूहाला सेंद्रिय बियाणे उपलब्ध करून देणे आणि त्यांचे सेंद्रिय उत्पादन विकत घेण्याचे दुहेरी काम या पुढाकारातून केले जात आहे. शेतकऱ्यांना हळद (Turmeric) आणि भरडधान्यांचे (Millets) सेंद्रिय बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जाते.

'अलस्वमित्र'च्या या प्रयोगात एनजीओकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय बियाणे दिले जाते. ते मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावी लागते. या बियाण्यांचा वापर करून आलेले उत्पादन शेतकरी या एनजीओला विकतात. त्यामुळे सेंद्रिय बियाण्यांचे प्रमाण वाढत जाते. याशिवाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दलची जागरूकता वाढत असल्याचे सांगण्यात आले.

अलस्वमित्रने सहज सीड्ससोबत (Sahaja Seeds) सहकार्य करार केला. सहज सीड्स ही शेतकऱ्यांच्या मालकीची सेंद्रिय बियाण्यांची शेतकरी उत्पादक संस्था आहे. सहज सीड्सकडे दहा हजार सेंद्रिय बियाण्यांचा साठा आहे.

कसा आहे अलस्वमित्राचा प्रयोग?

'अलस्वमित्र'कडून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि अंदमान व निकोबार येथील आदिवासी समूहातील शेतकऱ्यांना हळद आणि भरडधान्यांचे सेंद्रिय बियाणे पुरवण्यात येते. संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या ( Food and Agriculture Organisation) निकषानुसार संबंधित शेतकऱ्यांसोबत रीतसर करार केला जातो. सेंद्रिय बियाण्यांसाठी संबंधित शेतकरी रोख पैसे देऊ शकतात अथवा बियाण्यांच्या रूपाने मोबदला देऊ शकतात.

या बियाण्यांची किंमत ते शेतकरीच ठरवतात. त्यांना कर्ज म्हणून हे बियाणे देण्यात येते, पेरल्यानंतरच त्याचा मोबदला त्यांनी द्यायचा असतो, असे 'अलस्वमित्र'चे संचालक निल थॉमस म्हणाले.या करारामुळे संबंधित शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय (Organic Seeds) वाण मिळते. हे वाण अधिक उत्पादन देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ होते. हे वाण मिळवण्यापूर्वी त्यांना स्वतःची शेतकरी उत्पादक संस्था (Farmer Producer Organisation) स्थापन करावी लागते. हे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि त्यांची बार्गेनिंग क्षमता वाढेल, याचा विचार या प्रयोगात करण्यात आल्याचेही थॉमस यांनी सांगितले.

Organic Farming
Maharashtra Politics:विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर विरुद्ध साळवी

डॉ. जॉर्ज आणि ललिता रेगी यांनी १८ वर्षांपूर्वी 'अलस्वमित्र'ची मुहूर्तमेढ केली. नव्वदच्या दशकात त्यांनी धर्मापुरी जिल्ह्यातील (तामिळनाडू) सित्तीलिंगी परिसरात काम केले होते. २००९ साली 'अलस्वमित्र'च्या पुढाकारातून सित्तीलिंगी ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशनची (SOFA) स्थापना झाली. या संघटनेच्या सभासदांनी केवळ सेंद्रिय शेती करण्याचे आणि आपल्या उत्पादनाचा निम्मा वाटा संघटनेला विकण्याचे मान्य केले.

याचा परिणाम म्हणून या आदिवासींनी कमी पाण्यात अधिक पोषक घटक असलेल्या भरडधान्याचे (Millets) सेंद्रिय उत्पादन घ्यायला सुरुवात केली. तर रोखीचे पीक (cash crop) म्हणू सेंद्रिय हळद पिकवायला सुरुवात झाली. म्हणजेच भरडधान्य उत्पादनाने त्यांची खाद्य गरज भागली अन पैशांची गरज हळदीच्या पिकाने भागवली. आदिवासी समूहाला त्यांच्या पारंपरिक शेती पद्धतीकडे वळवून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या गरजा भागवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, असे थॉमस म्हणाले.

Organic Farming
DSR Technique for Farmers: डीएसआर तंत्राने भात लागवड योजनेस पुन्हा मुदतवाढ

अलस्वमित्रने या शेतकऱ्यांना हळदीचे प्रतिभा हे अधिक उत्पादन देणारे वाण उपलब्ध करून दिले. याशिवाय त्यांना बियाणे परतीचे अथवा त्यांचे उत्पादन खाजगी व्यापाऱ्यांना विकण्याचे स्वातंत्र्य दिले. संबंधित शेतकऱ्यांमध्ये बाजारपेठेची समज वाढवण्यासाठी नोव्हेंबर २०१५ ला सित्तीलिंगी ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (Sittilingi Valley Organic Farmers Producer Company) स्थापन करण्यात आली.

ही कंपनी या शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करायला लागली. या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या, आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याची सवयही त्यांच्यात विकसित झाल्याचे थॉमस म्हणाले. या शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक दर देऊन 'अलस्वमित्र' कडून विकत घेतले जाते. ही उत्पादने अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या डिजिटल प्लॅटफार्मवरही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Organic Farming
Kisan Drone : स्टार्टअप्स आणि कृषी रसायन क्षेत्रात समन्वय हवा

ग्रेन फॉरेस्ट या ब्रॅंडनेमनी ही उत्पादने विकल्या जातात. दक्षिण भारतीय राज्यांतील १२ हाजारांहून अधिक शेतकरी या प्रयोगात सहभागी झालेत. ग्रेन फॉरेस्टने आपल्या प्रक्रिया आणि पॅकिंग विभागात आदिवासी महिलांना सहभागी करून घेतले, ज्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला. या व्यवसायातून झालेल्या एकूण नफ्यातील ४० टक्के वाटा या विविध माध्यमातून आदिवासी समूहालाच परत दिला जात असल्याचेही थॉमस यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com