Grape Rate : शेतकऱ्यास द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ‘ग्रेपनेट’ प्रणालीत नोंदणी करण्यासाठी मोहीम राबवावी.
Grape Rate
Grape RateAgrowon

Nashik Grape Rate News : ‘‘द्राक्ष कोणत्या देशात निर्यात झाली. यासह शेतकऱ्यांनी द्राक्ष (Grape) कोणत्या निर्यातदाराला दिली. त्यापोटी निर्यातदाराने शेतकऱ्याला पूर्ण द्राक्षाचे पेमेंट केले की नाही, याची खातरजमा करून माहिती संकलित करा,’’ अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कृषी विभागाच्या (Agricultural Department) क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या.

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातक्षम फळे, भाजीपाला, द्राक्ष बाग नोंदणी व निर्यात याबाबत निफाड उपविभागातील सिन्नर, निफाड, येवला व चांदवड तालुक्यांतील सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यामध्ये प्राधान्याने २०२२-२३ मधील ‘ग्रेपनेट’ प्रणालीमध्ये नोंदणी व नूतनीकरण केलेल्या द्राक्ष उत्पादकांची संख्या, प्रपत्र ४-ब वितरण याबाबत आढावा घेण्यात आला.

वाघ यांच्या सूचनेनुसार पेमेंटबाबत माहिती संकलित होईल. त्यामुळे पैसे बुडविणाऱ्या निर्यातदारांची माहिती यातून पुढे येईल. या प्रसंगी कृषी उपसंचालक कैलास शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी उपस्थित होते.

Grape Rate
Grape : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर फसवणुकीची टांगती तलवार

‘‘निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन प्रक्रियेत पुढील काळात कृषी विभागाच्या प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात बागेत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. लेबल क्लेम असलेलीच कीटकनाशके फवारणीच्या वेळापत्रकात समाविष्ट करावीत.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ‘ग्रेपनेट’ प्रणालीत नोंदणी करण्यासाठी मोहीम राबवावी. प्रत्येक शेतकऱ्याचे रासायनिक प्रयोगशाळेत गेलेल्या नमुन्यांच्या नोंदी प्रत्यक्षात निर्यात आकडेवारी, निर्यातीव्यतिरिक्त इतर द्राक्ष कोणत्या ठिकाणी विक्री केली. त्याला किती दर मिळाला, याची माहिती घ्यावी, अशा सूचना वाघ यांनी केल्या.

जिल्ह्यात ‘प्रपत्र ४-ब’ नुसार रासायनिक प्रयोगशाळेत पाठवलेले द्राक्ष नमुने नापास झाले आहेत. त्यामागील कारणे शोधण्याचे आदेश या वेळी बैठकीत देण्यात आले.

या पुढील काळात ‘प्रपत्र ४-ब’ भरताना संबंधित शेतकऱ्याच्या शेताचा नकाशा, प्रपत्र ५ नुसार फवारणीसाठी वापरलेली कीटकनाशके, खताची बिले व प्रत्यक्ष बागेचे जीपीएस छायाचित्र असल्याशिवाय ‘४-ब प्रमाणपत्र’ देण्यात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली.

प्रत्यक्ष बागेत जाऊन जेवढा माल निर्यात होईल, तेवढ्याच वजनाचा उल्लेख ‘४-ब प्रपत्रात’ असावा. जास्त वजनाचा उल्लेख केल्यास अनेक निर्यातदार त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. त्याचे परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता वाघ यांनी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

‘नियमावलीप्रमाणेच काम व्हावे’

द्राक्ष निर्यातीमुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. त्यामुळे शेतकरी, निर्यातदार, प्रयोगशाळा, लॉजिस्टिक व अंतिम ग्राहक यामध्ये शासनाने ज्या नियमावली घालून दिल्या आहेत.

त्यास कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. त्यासाठी कृषी विभागाने कायम सतर्क राहावे, असे सूचना वाघ यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com