Mango Season : आंबा आवकेनंतरही केसर महागच

Hapus Mango Market : विक्रमगड तालुक्यातील प्रसिद्ध गोड केसर, गावठी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे; मात्र या वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे चढ्या भावाने विक्री होत आहे.
Mango Season
Mango SeasonAgrowon

Mango Market Rate : विक्रमगड तालुक्यातील प्रसिद्ध गोड केसर, गावठी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे; मात्र या वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे चढ्या भावाने विक्री होत आहे. गेल्या वर्षी याच आंब्याचा किलोला भाव ६० ते ८० रुपये दराने विक्री होत होती; मात्र यंदा दुपटीपेक्षा जास्त भावाने म्हणजेच १६० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

सध्या आंब्याचा हंगाम असल्याने गावठी गोड आंब्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ग्राहक डझनच्या दराने आंबे खरेदी करत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी आंबे विकले जावे, यासाठी बागायतदारांची धडपड आहे.

विक्रमगडमधील कसदार मातीत हापूस, केसर, लंगडा, पायरी आंबा उत्तम होत आहे. यंदा पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Mango Season
Sharad Pawar Mango Variety : अन् शेतकऱ्यानं आंब्याला दिलं शरद पवारांच नाव

मात्र यंदा १० मेनंतर आंब्याची आवक झाली असूनही भाव मात्र कायम आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आंब्याचा दर पावसाळ्याच्या तोंडावर अधिक असल्याने गाहकांचा हिरमोड झाला आहे.

येत्या काही दिवसांत आंब्याच्या किमतीत घट होईल, असा विश्‍वास तालुक्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा वादळी, अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आवश्‍यक प्रमाणात आंबे बाजारात आले नाहीत, त्यामुळे मागणी अधिक आहे. यंदा उशिरा आंबा बाजारात दाखल झाला असून आंब्याचे भाव प्रचंड वाढले आहेत.
विजय सांबरे, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com