Minister Dr. Tanaji Sawant : राज्यातील प्रत्येक विभागाचा आरोग्यविषयक आराखडा करावा

Health Plan :आंध्र प्रदेश, केरळ तसेच राजस्थान या राज्यांतील आरोग्य सेवांची पाहणी करण्यासाठी विभागातील शिष्टमंडळाने भेट द्यावी. आपल्याकडे काय बदल करता येतील, यासाठी एक पाहणी अहवाल शासनास सादर करावा.
Minister Dr. Tanaji Sawant
Minister Dr. Tanaji SawantAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : आंध्र प्रदेश, केरळ तसेच राजस्थान या राज्यांतील आरोग्य सेवांची पाहणी करण्यासाठी विभागातील शिष्टमंडळाने भेट द्यावी. आपल्याकडे काय बदल करता येतील, यासाठी एक पाहणी अहवाल शासनास सादर करावा.

राज्यातील प्रत्येक विभागीय उपसंचालकाने आपल्या विभागाचा आरोग्यविषयक आराखडा तयार करावा, अशी सूचना आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर विभागातील आरोग्य सेवेचा आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी रविवारी (ता. १४) आढावा घेतला.

या वेळी अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोई, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. श्रीमती बी. एस. कमलापूरकर, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे, लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. पी. एम. ढोले उपस्थित होते.

Minister Dr. Tanaji Sawant
Chhatrapati Sambhaji Jayanti : किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करणार

डॉ. सावंत म्हणाले, की राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया.

रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षांवरील महिला, गर्भवती स्त्रीया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानामुळे राज्याच्या आरोग्य सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा दिली. आरोग्य यंत्रणेचे प्राथमिक आरोग्य केंद्रापासूत ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सेवा देणारी यंत्रणा चांगले काम करते आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासोबतच फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

जिल्हा व विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले. रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Minister Dr. Tanaji Sawant
Cashew Cultivation : वैभववाडी तालुक्यातील उदय सावंत यांनी केलीय उत्तम काजूची लागवड

सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आपला दवाखाना उपक्रम सुरू केला आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यात सद्यःस्थितीत ३१७ दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्यांत वाढ करण्यात येत आहे.

आपल्या दवाखान्यांत येणाऱ्या रुग्णांच्या नोंदी अद्ययावत ठेवा व याबाबतच प्रत्येक पंधरा दिवसाला शासनास अहवाल सादर करा, असे निर्देश देत ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. त्यानुसार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करूया, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com