सबका नंबर आयेगा

युरोपातील जवळपास ६० टक्के भूभागावर दुष्काळसदृश्य परिस्थिती दाटत आहे. पाचशे वर्षांतील हे सर्वाधिक गंभीर संकट ठरू शकते.
Europe Drought
Europe Drought Agrowon

युरोपातील जवळपास ६० टक्के भूभागावर दुष्काळसदृश्य परिस्थिती (Drought Condition In Europe) दाटत आहे. पाचशे वर्षांतील हे सर्वाधिक गंभीर संकट ठरू शकते. पाचशे वर्षे का ? कारण पर्यावरणीय संतुलन (Environment) बिघडण्यास त्याचवेळी सुरुवात झाली होती; त्याआधी नाही. हा दुष्काळ (Drought) ऐतिहासिक उच्च तापमान आणि कमी पर्जन्यवृष्टी यांचा दुहेरी परिणाम आहे. ब्रिटनमध्ये सरासरीच्या फक्त ३५ टक्के पाऊस झाला आहे. थेम्ससकट अनेक नद्यांचे झरे आटत आहेत. लंडन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेम्स वॉटर कंपनीने पाणीकपात जाहीर केली आहे. जंगलांना वणवे लागत आहेत. पिके करपून जात आहेत. नद्यांचे पाणी कोमट झाल्यामुळे त्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे आणि मासे (Fish Died) मरू लागले आहेत. गायी, म्हशी आणि इतर पशुपालनावर (Herding) परिणाम होत आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन इत्यादी जवळपास सगळ्याच देशांमध्ये कमी-जास्त हीच परीस्थिती आहे.

Europe Drought
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

युरोप/अमेरिकेत बाकी मात्र सगळे ओक्केमध्ये सुरु आहे. म्हणजे ‘नाटो'मध्ये कोणाकोणाला घ्यायचे ते ठरवू, डॉलर कसा अजून स्ट्रॉंग बनवायचा, फेड व्याजदर वाढवून दमली आहे तर मधल्या काळात चला स्टॉक मार्केट वर नेऊया, फ्रान्सपासून अनेक राष्ट्रांत वंशवाद अजून पसरवूया, स्थलांतरितांना हाकलून लावूया, आधी रशियाला युक्रेनवरून उचकवूया आणि काही दिवसांनी तैवानवरून चीनला, बिलियन ऑफ डॉलर्सची युद्धसामुग्री खरेदी करूया वगैरे सगळं साग्रसंगीत सुरू आहे.

तुमचे शेकडो पानांचे स्पायरल बाउंड अहवाल, प्रचंड आकडेवारीचा काथ्याकूट, पंचतारांकित हॉटेलांत वाईन किंवा कॉफीचे घुटके घेत पुढच्या अमुक वर्षांत समुद्राचे सरासरी तापमान १.५ अंशाने वाढेल की १.४ अंशाने यावर केलेल्या चर्चा... या सगळ्याचे निसर्गाला काहीही पडलेली नाही. त्याला डोक्यावरचे ओझे असह्य झाले आहे, हे तो वारंवार आपल्याला त्याच्या भाषेत सांगत आहे. आणि हे देखील की मर्यादेबाहेर गेले की तो सगळे संतुलन भिरकावून देणार आहे.

Europe Drought
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

कदाचित राजकारणी/ बँकर्स/ बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डायरेक्टर्स/ वॉल स्ट्रीट, दावोस मध्ये जमणारे सगळे यांच्या बुडाला आग लागल्याशिवाय त्यांची ‘जीडीपीझम'ची नशा उतरणार नाहीये. निसर्ग-पर्यावरण जागतिक एलिट्सच्या मुस्कटात मारेल, कमरेत लाथा घालेल, रक्तबंबाळ करेल. मान्य आहे की यात पृथ्वीवरील कोट्यवधी सामान्य नागरिक होरपळले जाणार आहेत; पण हे देखील खरे की जागतिक एलिट्सना वठणीवर आणणारी एकमेव शक्ती शिल्लक आहे, ती म्हगणजे निसर्ग-पर्यावरण. कारण जागतिक एलिट्सचे आयुष्य असेल काही शे वर्षांचे तर निसर्ग-पर्यावरण कोट्यवधी वर्षे जुने आहेत. आणि मुख्य म्हणजे ते स्वयंभू आहेत.

भारतीय एलिट्स/ राज्यकर्ता वर्ग हा जागतिक एलिट्सचा अविभाज्य सभासद आहे. सबका नंबर आयेगा.

समाजवादी, कम्युनिस्टांना आवाहन

काही दिवस ‘समाजवादी समाजरचनेशिवाय आपल्याला पर्याय नाही' अशा अर्थाची वाक्ये वापरणे बिलकुल बंद करा. काही दिवस भविष्याबद्दल न बोलता वर्तमानाबद्दलच बोला. भविष्याबद्दल बोललात की ‘ते' तुम्हाला ‘इतिहासा'त अडकवतात. उदा : रशियात काय झाले आणि चीनमध्ये काय चालू आहे याबद्दल तुम्हाला उत्तरदायी धरतात. आताच्या आर्थिक हलाखीबद्दल बोलतात तर हुकूमशाहीबद्दल प्रश्न उपस्थित करतात. कशाचं काय आणि फाटक्यात पाय. त्यांचा अजेंडा तुमचे साधे प्रश्न लोकांच्या कानावर पडूच नयेत, हा असतो.

तुम्ही ‘त्यांच्या'शी बोलूच नका. तुम्ही साध्यासुध्या बायाबापड्यांशी बोला. त्या साध्या माणसांच्या साध्यासुध्या भौतिक प्रश्नांबद्दल त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की, तुमच्या लहान मुलामुलींनी भरपूर शिकावे असे तुम्हाला वाटते की नाही? मग आताच्या खासगी शाळा तुम्हाला परवडणार नाहीत; म्हणजे सरकारने शाळा, कॉलेजवर भरपूर खर्च केले पाहिजेत असे तुम्हाला वाटते की नाही? सरकारने हे खर्च करायचे तर सरकारकडे कररूपाने पैसे गोळा झाले पाहिजेत; मग त्यांना आपल्या देशाच्या टॅक्स/ जीडीपी रेशो सर्वात कमी आहे ते सांगा. मग कर संकलनाबद्दल प्रश्न विचारा. तुम्हाला मुलांना शिकवायचे तर तुमचे मासिक उत्पन्न पुरेसे हवे. नाही तर मुलांना शिक्षण सोडून पैसे कमवणे भाग पडेल. म्हणजे मग किमान वेतन बरे हवे आणि तुमचा स्वयंरोजगार चांगला हवा.

वरचे हे तर एक उदाहरण झाले. ग्रामीण भागात शेतीवर, शहरात सार्वजनिक वाहतुकीवर, पिण्याच्या पाण्यावर, आरोग्यव्यवस्थेवर, म्हातारपणातील असुरक्षिततेबद्दल चांगले किमान शंभर प्रश्न तयार ठेवा. शासनाकडे नागरिकांनी भीक/ पैसे मागण्याची भाषा न करता शासकीय धोरणे, अर्थसंकल्पीय तरतुदी यावर बोला. आपण निवडून देतो सरकाराला आणि लोकशाहीत आपल्या मायबाप सरकारकडे आपण नाही मागणार तर कोण मागणार यावर बोला. समाजवाद, आदर्श समाज वगैरे काही दिवस बोलूच नका.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com