Rain Update : हिंगोली, परभणीतील २५ मंडलांत अतिवृष्टी

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा गावांत आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

हिंगोली ः हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील सर्व ८२ मंडलांत शनिवारी (ता. ९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. हिंगोलीतील १० आणि परभणी जिल्ह्यातील १५ मंडलांत अतिवृष्टी (Excessive Rain In Hingoli) झाली.

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा गावांत आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे हळद, ऊस, केळी, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Heavy Rain
जेऊर, मिरी मंडलांत पहिल्याच दिवशी अतिवृष्टी

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत मुसळधार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा, आंबा, गिरगाव आदी मंडलांत ढगफुटी सदृश पाऊस झाला. ओढे, नाल्यांना पूर आले. पुरामुळे टाकळगाव, इंजगाव, रुंज या गावांतील आखाड्यावर अडकडून पडलेल्या सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

परभणी जिल्ह्यांतील सर्व ५२ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला. येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.

१०० मिमीपेक्षा अधिक पावसाची मंडले

हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर १२७.५, डोंगरकडा १५७.८, वारंगा १५०, आंबा १३०.५, गिरगाव १६७.८, कुरुंदा १७९.३

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण ६७, सिंगणापूर ६८, दैठणा ७८, केकरजवळा ६७.३, आवलगाव ८७, वडगाव ८७, गंगाखेड ७०.८, महातपुरी ७१.८, माखणी ७२.५,पिंपळदरी ७२.५, पालम ६९.३, पेठशिवणी ७४.३, रावराजूर ६८.५, ताडकळस ७०.८, लिमला ७०.८.

मंडलनिहाय पाऊस (५० मिमीच्या पुढे)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ५८.३, नरसी नामदेव ६३, डिग्रस कऱ्हाळे ५५, हट्टा ५२.३, टेंभुर्णी ५५.८, जवळा बाजार ५३.

परभणी जिल्हा ः परभणी ६४.५, पिंगळी ५८, टाकळी कुंभकर्ण ६४.५, रामपुरी ६४.३, बाभळगाव ५७, सोनपेठ ५९.३, शेळगाव ५८.३, राणीसावरगाव ५८.८, पूर्णा ५९.५, चुडावा ६१, कावलगाव ६१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com