Rain Update : नांदेड, परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीने दाणादाण

मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे.
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अतिवृष्टीने (Heavy Rainfall) हाहाकार उडाला आहे. नद्यांना पूर (Flood) आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. कोकणात पाऊस कमी-अधिक होत असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Level) वाढ झाली आहे.

गेले काही दिवस मराठवाड्यात जोर कमी असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता.८) सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी. हिंगोली, नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोलीतील आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. कुरुंदा (ता.वसमत) येथे आसना नदीच्या पुराचे पाणी शिरले. घरांची पडझड झाली. जमिनी खरवडल्या. जनावरे वाहून गेली. पुरामुळे शेलगाव (ता. अर्धापूर) येथे संपर्क तुटला. पांगरी शिवारात केळी व सोयाबीन पाण्याखाली गेले. पुराने वेढलेल्या गावातील नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली. परभणीतील पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आला.

Heavy Rainfall
Rain Update : राज्यात कुठे झाला धुव्वांधार पाऊस?

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाचा जोर-कमी अधिक असल्याचे दिसून आले. तर जळगाव, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. जळगावात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. नाशिकमधील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी जोरदार पावसाने हजेरी लावली. पुणे, नगर, साताऱ्याच्या घाटमाथ्यासह जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. सोलापुरात पावसाच्या सरी झाल्या. वारकऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोल्हापुरात पावसाची संततधार होती, तर सांगलीत रिमझिम पाऊस पडला. विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. उर्वरित विदर्भात मध्यम ते हलक्या सरी कोसळल्या.

शनिवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : जव्हार १३१, मोखाडा १२९.

रायगड : कर्जत ८०, माथेरान ८५, रोहा ६६, सुधागडपाली १०६.

रत्नागिरी : खेड ६७, राजापूर ५३.

सिंधुदुर्ग : देवगड ८७, दोडामार्ग १३२, कणकवली १३७, कुडाळ ११९, मालवण १०२, सावंतवाडी १५३, वैभववाडी १३७, वेंगुर्ला ११८.

......

मध्य महाराष्ट्र :

नगर : नेवासा ४७.

जळगाव : भडगाव ७०.

कोल्हापूर : आजरा ६४, गगनबावडा ५७, गारगोटी ५५, पन्हाळा ४०, राधानगरी ५९, शाहूवाडी ६१.

नंदूरबार : अक्कलकुवा ३८, नंदुरबार ७७.

नाशिक : हर्सूल १२८, इगतपुरी ९२, नाशिक ५८, ओझरखेडा ११५, पेठ १८४, सुरगाणा ४५, त्र्यंबकेश्वर ९३.

पुणे : भोर ६४, लोणावळा कृषी ११३, पौड ४२, तळेगाव ४१, वडगाव मावळ ५०, वेल्हे ७८.

सातारा : खंडाळा ३८, महाबळेश्वर १५०.

सोलापर : मोहोळ ३५, सोलापूर ३५.

मराठवाडा :

औरंगाबाद : गंगापूर ५४.

बीड : अंबाजोगाई ५५, माजलगाव ५२, परळी वैजनाथ ६५, वाडवणी ५६.

हिंगोली : औंढा नागनाथ ५९, हिंगोली ४४, कळमनुरी ७३, सेनगाव ४२, वसमत ८२,

जालना : मंथा ५०.

लातूर : चाकूर ४८, लातूर ४८, रेणापूर ५५, शिरूर अनंतपाळ ४३.

नांदेड : अर्धापूर १४४, भोकर ९२, बिलोली ४०, हादगाव ९६, हिमायतनगर ७३, कंधार ६०, लोहा ५२, मुदखेड १४४, मुखेड ३३, नायगाव खैरगाव ४५, नांदेड १२१, उमरी ४७.

उस्मानाबाद : उस्मानाबाद ५३, तुळजापूर ५८.

परभणी : धालेगाव ४८, गंगाखेड ७२, मानवत ५८, पालम ६०, परभणी ९०, पाथरी ६३, पूर्णा ५८, सोनपेठ ८०.

.....

विदर्भ :

अमरावती : चिखलदरा ३६.

भंडारा : मोहाडी ३१.

चंद्रपूर : वरोरा ५८,

गडचिरोली : अहिरी ५७, भामरागड १४१, चामोर्शी ४१, एटापल्ली ५३, कोरची ५९.

वर्धा : समुद्रपूर ४८.

यवतमाळ : अर्णी ४५, पुसद ५१, उमरेड ४९.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com