Grampanchyat : सरपंच, उपसरपंचाची कामे कोणती असतात?

पंचायतीच्या कारभारात स्थिरता यावी आणि कामात गुणवत्ता असावी, यास्तव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात बदल केले आहेत. त्यानुसार पंचायतीचे कार्यकारी अधिकार आणि सरपंच, उपसरपंचाची कार्ये याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊ.
Grampanchyat Administration
Grampanchyat AdministrationAgrowon

सुमंत पांडे

नुकतीच सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक (Sarpanch Election) पार पडलेली आहे. पंचायतीच्या कारभाऱ्यांनी (Grampanchayat Administrator) पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी त्यांना आपली कर्तव्ये आणि अधिकार माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

काही मूलभूत बदल, जसे की - थेट निवड झालेला सरपंच हा पंचायतीचा पदसिद्ध सदस्य असेल. ग्रामपंचायतीच्या मूळ सदस्यांची संख्या आहे तेवढीच राहून सरपंच हे पद अतिरिक्त असेल. पंचायतीच्या प्रत्येक सभेचा अध्यक्ष हा सरपंच असेल.

थेट निवडणून आलेल्या सरपंच पदासाठी अविश्वाश्‍वासाच्या तरतुदी :

१) अविश्‍वास ठराव सादर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असेल.

२) पंचायतीच्या सभेत सदस्यांची संख्या एकूण संख्येच्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त असेल इतक्या बहुमताने ठराव संमत व्हावा लागेल.

३) त्यानंतर जिल्हाधिकारी एका अधिकाऱ्यास नियुक्त करतील.

४) नियुक्त अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात येईल.

५) अशा ग्रामसभेत गुप्त मतदानद्वारे अविश्‍वासाचा प्रस्ताव मंजूर झाला तरच सरपंच किंवा उपसरपंच या पदाच्या सर्वाधिकाराचा वापर करण्याचे थांबवतील.

६) अविश्‍वास ठराव फेटाळला गेल्यास पुढील दोन वर्षांच्या कालावधीत पुन्हा अविश्‍वास ठराव दाखल करता येणार नाही.

७) सरपंच आणि उपसरपंच निवडीपासून दोन वर्षांच्या आत आणि पंचायत मुदत संपण्यास सहा महिने बाकी असतील, तर अविश्‍वास ठरावा दाखल करता येणार नाही.

८) सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे अधिकार, कार्य व कर्तव्य उपसरपंचाकडे सोपविण्यात येईल.

कार्ये ः

१) पंचायत सभांच्या कार्यसूचीस अंतिम रूप देणे ः

१) पंचायतीच्या सर्व विषयांची कार्यसूची ठरविण्याचा अधिकार सरपंचास आहे. त्यामुळे सचिवांनी पंचायत सभा आयोजित करण्यासाठी सभेची टिपणी करून सदर विषयास (टिपणीस) मान्यता घेऊनच विषयपत्रिका काढणे अभिप्रेत आहे.

२) तीन किंवा ३ पेक्षा अधिक सदस्यांनी लगत नंतरच्या कार्यसूचीवर कोणत्याही बाबींचा समावेश करण्याची मागणी केली, तर सरपंच ही बाब पुढच्या सभेच्या कार्य सूचित समाविष्ट करेल.

३) सूचीमध्ये नसल्यास अनौपचारिकपणे वित्तीय कामकाज चालविले जाणार नाही.

२) पंचायतींचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.

३) पंचायतीशी विचारविनिमय करून योजना राबविण्यासाठी इतर सर्वाधिकारांचा वापर करणे.

४) कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची स्थापना करणे.

५) या सर्व समित्यांच्या पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असेल व ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल.

Grampanchyat Administration
Gram Panchayat Election : नव्या वर्षातही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

६) अंदाजपत्रक तयार करणे ः

१) थेट निवडून आलेला सरपंच विहित नमुन्यात ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करेल. त्यानंतर दिनांक ३१ जानेवारी किंवा त्यापूर्वी अंदाजपत्रकास पंचायतीची मान्यता आणि २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेची मान्यता घेऊन पंचायत समितीला सादर करेल.

पंचायत समिती या अंदाजपत्रकात ३१ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी मान्यता देईल.

२) थेट निवडून आलेला सरपंच आर्थिक वर्षात सुधारित किंवा पूरक विवरण तयार करू शकेल. तसेच हे मूळ विवरण असल्याचे समजण्यात येईल. त्याला पंचायत समितीची मान्यता घ्यावी लागेल.

३) सुधारित किंवा पूरक विवरण तयार करताना कलम ६२ च्या तरतुदी लागू असतील. (म्हणजे पंचायतीची मान्यता ग्रामसभेची मान्यता ही बंधनकारक राहील.

सरपंचाची जबाबदारी आणि कर्तव्य ः

१) ग्रामपंचायतीची सभा बोलावणे.

२) अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे.

३) सभेत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे.

४) ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे.

५) ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे.

६) जमाखर्चाची विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे.

७) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचे कलम ४९ नुसार स्थापना करण्यात आलेल्या ग्रामविकास समित्या त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून भूषविणे.

८) ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश यास सरपंच व ग्रामसेवक संयुक्त जबाबदार राहतील.

ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक ः

ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक हा पंचायतीचा महत्त्वाचा दस्त असतो. त्यानुसार पंचायतीची आर्थिक रचना स्थापित होते. त्यामुळे त्यावर पूर्ण अभ्यासांती काम होणे गरजेचे आहे.

फक्त ग्रामसेवकावर अवलंबून राहणे टाळावे. अंदाजपत्रक म्हणजे केवळ कागद किंवा आकडेवारी नव्हे, तर पंचायतीच्या विकासासाठी लागणारी अर्थव्यवस्था तयार करणे होय. हे अंदाजपत्रक मासिकसभा आणि ग्रामसभेपुढे मान्यतेसाठी सादर करणे गरजेचे आहे.

१) सूक्ष्म नियोजनाद्वारे ग्रामविकास आराखडा तयार करणे ः याचा आणि वार्षिक अंदाजपत्रकाचा थेट संबंध असतो. आराखडा जितका अचूक आणि सर्वसमावेशक तितके गावाचे अंदाजपत्रक योग्य असेल.

२) ग्रामसभा व ग्रामपंचायतच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.

३) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे.

४) गाव पातळीवरील विविध संस्थांची समन्वय साधून कामांचे नियोजन करणे.

५) गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे. शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना मिळवून देणे.

६) महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

७) ग्रामपंचायतीची गरज असेल तेव्हा ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.

८) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४५ मधील अनुसूचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचावर आहे.

Grampanchyat Administration
Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

९) सरपंचांनी आपले कर्तव्य पार पडण्यास कसूर केला तर त्याला पदावरून दूर करता येते.

१०) सरपंच लोकसेवक या नात्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडेल. स्वतःच्या सहीने उत्पन्नाचे प्रमाणपत्र देईल.

११) ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून देखील सरपंच जबाबदारी पार पाडेल. त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास पत्ता व लेखे मंजूर करण्याचे अधिकार आहेत.

सरपंचाची जबाबदारी आणि कर्तव्य ः

१) ग्रामपंचायतीची सभा बोलावणे.

२) अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे.

३) सभेत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे.

४) ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे.

५) ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे.

६) जमाखर्चाची विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे.

७) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचे कलम ४९ नुसार स्थापना करण्यात आलेल्या ग्रामविकास समित्या त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून भूषविणे.

८) ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश यास सरपंच व ग्रामसेवक संयुक्त जबाबदार राहतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com