Agriculture Produce Market : सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

Market Committee : मागील (२०२२-२३)आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न १२ कोटी २५ लाख २४ हजार ८९४ रुपये तर खर्च १५ कोटी १० लाख ६३ हजार ५२ रुपये आहे.
Agriculture Produce Market Committee
Agriculture Produce Market CommitteeAgrowon

Parbhani APMC News : उत्पन्न, खर्च, वाढावा, तूट, आस्थापना खर्च, वर्गवारी वार्षिक अहवालानुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यातील ११ पैकी परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे.

त्यामुळे या बाजार समित्या तोट्यात आहेत.उर्वरित ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा वाढावा (नफा) नुसार मानवत, बोरी, ताडकळस, सोनपेठ असा क्रम आहे.

मागील (२०२२-२३)आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न १२ कोटी २५ लाख २४ हजार ८९४ रुपये तर खर्च १५ कोटी १० लाख ६३ हजार ५२ रुपये आहे. आस्थापना खर्च १० कोटी ७२ लाख २० हजार ६४३ रुपये आहे.

उत्पन्नानुसार जिल्ह्यामध्ये अ वर्ग बाजार समित्यांमध्ये परभणी, जिंतूर, सेलू, मानवत या ४ बाजार समित्यांचा समावेश आहे. ब वर्ग बाजार समित्यांमध्ये पाथरी, सोनपेठ या २ बाजार समित्यांचा तर क वर्ग मध्ये बोरी, गंगाखेड, पूर्णा या ३ बाजार समित्या आहेत.

Agriculture Produce Market Committee
Chana Market Rate : हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच

ड वर्ग मध्ये पालम व ताडकळस या २ बाजार समित्या आहेत. परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत १४ उपबाजार आहेत. त्यात परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत झरी, पेडगाव, दैठणा, जिंतूर बाजार समिती अंतर्गंतं चारठाणा, आडगाव, वाघी, सावंगी, सेलू बाजार समिती अंतर्गत वालूर, देऊळगावगात, मानवत बाजार समिती अंतर्गत रामपुरी बुद्रूक, रामेटाकळी, पाथरी अंतर्गंत हादगाव, पूर्णा अंतर्गंत कावलगाव, गंगाखेड अंतर्गंत राणीसावरगाव या उपबाजारांचा समावेश आहे.

शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे अनेक बाजार समित्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे वर्गवारीत बदल झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह अन्य खर्चासाठी अडचणी येत आहेत.

२०२२-२३ आर्थिक वर्षे बाजार समितीनिहाय उत्पन्न,खर्च,तूट स्थिती (कोटी रुपये) वर्गवारी

बाजार समिती- उत्पन्न - खर्च- वाढवा- तूट - आस्थापना खर्च - वर्गवारी

परभणी- १.३५- ३.५६- ००० - ०३७०७ - २.५७ - अ

जिंतूर - २.३१ - २.९०- ००० - ०.५९०८ - २.२८ - अ

सेलू - २.२५ - २.२८ - ०००- ०.२९ - १.५८- अ

मानवत - ३.०६- २.७१- ०.३५५९- ००० - १.९५- अ

पाथरी- ०.६५२४ - ०.७४१२- ०००- ०.८८८- ०.४८९१- ब

सोनपेठ- ०.६४९०- ०.६४३७- ०.०५३- ०००- 0.५१३८- ब

गंगाखेड - ०.४६६१ - ०.८७९५- ००० - ०.१३१४- ०.५१४० - क

बोरी ०.४७३५ - ०.३९८७ - ०.०७४८- ०००- ०.२७६८- क

पूर्णा - ०.६४९७ - ०.७८१७- ०००- ०.१३२०- ०४६०८- क

पालम - ०.११९०- ०.३७६६- ००० - ०.२५७६ - ०.३६१०- ड

ताडकळस - ०.२४५६- ०.२१८१ - ०.०२७५- ००० - ०.०२८२ ड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com