Grape Export : सांगलीतून १६ हजार टन द्राक्षाची निर्यात

सांगली जिल्ह्यातून युरोपसह आखाती देशात १६ हजार ५६९ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची निर्यात वाढू लागल्याचे चित्र आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

Grape Rate Update : सांगली जिल्ह्यातून युरोपसह आखाती देशात १६ हजार ५६९ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची निर्यात (Grape Export) वाढू लागल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात अधिक होईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचा हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातून गेल्या वर्षी ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी १६ हजार ३५८ टन द्राक्षाची निर्यात केली होती. यंदा द्राक्षाची निर्यात अधिक व्हावी, यासाठी कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढून निर्यातवाढीस चालना मिळाली आहे.

आजअखेर युरोपियन देशात ६७३ कंटेनर म्हणजे ९ हजार ७० टन तर आखाती देशात ४८३ कंटेनर म्हणजे ७ हजार ४९९ टन असे एकूण १६ हजार ५६९ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

Grape Export
Grape Cultivation: द्राक्षाची गोडी वाढवण्यासाठी शासनाने काय करायला हवं?

वास्तविक २०२१ मध्ये द्राक्ष निर्यातीसाठी ४ हजार २८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्याद्वारे २ हजार ३१७ हेक्टरवरील द्राक्षाची निर्यात झाली. २०२१ मध्ये युरोपियन देशात ९ हजार ९५६ टन आणि आखाती देशात १० हजार ०७३ टन अशी एकूण २० हजार २९ टन द्राक्ष सातासमुद्रापार पोहोचली होती.

यंदा ५ हजार ३०९ हेक्टरमधून होतेय द्राक्षनिर्यात

यंदा जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी ९ हजार ५१६ शेतकरी पुढे आले आहेत. सुमारे ५३०९ हेक्टरवरील द्राक्षनिर्यात होत आहेत. यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीचे संकट आले नसल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे निर्यात होण्यास अडचणी आल्या नाहीत.

जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्षी द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात) सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com