Water Shortage : रत्नागिरीत भूजल पातळीत कमालीची घट

उर्वरित आठ तालुक्यांत भूजल पातळीत घट झालेली दिसते. पाऊस लांबला असला तरीही ऑक्टोबर महिन्यात तीव्रता कमी झाली.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Ratanagiri Water News : जिल्ह्याच्या भूजल पातळीत (Ground Water Level) कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे. उन्हाळ्याचे अजूनही तीन महिने शिल्लक असून यंदा एक महिना आधीच उष्णतेच्या लाटेला (Heat Wave) आरंभ झाला आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत ०.०९ मीटरनी घट झाली आहे.

भूजल विभागाकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चार वेळा पाणी पातळी तपासली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केलेल्या आहेत. पाणी पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर मागील पाच वर्षांच्या पातळीशी तुलना सरासरी काढली जाते.

त्यावरून कोणत्या तालुक्यात टंचाई तीव्रता राहील याचा अंदाज बांधला जातो. जानेवारी २०२३ मध्ये घेतलेल्या नोंदीत रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी ०.०९ मीटरने घट झाली आहे.

Water Shortage
Water Level : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीपातळी सुस्थितीत

फक्त राजापूर तालुक्यातील पाणी पातळी स्थिर आहे. उर्वरित आठ तालुक्यांत भूजल पातळीत घट झालेली दिसते. पाऊस लांबला असला तरीही ऑक्टोबर महिन्यात तीव्रता कमी झाली.

त्याबरोबरच थंडीचा कालावधीही कमी राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी वेगाने जमिनीत मुरणे यासारखे प्रकार यंदा घडले आहेत. पावसावरच पाणी साठे अवलंबून असतात. तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसाही वाढला आहे.

यंदा देशभरातच उष्णतेची लाट लवकर दाखल झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम मानला जातो. उन्हाचा कडाका अधिक जाणवत असून मार्चच्या सुरुवातीलाच अनेकांच्या विहिरीची पाणी पातळी कमी झाली आहे. नदी किनारी परिसरातील विहिरींचे पाणी अजूनही स्थिर आहे.

उन्हाळा तीव्र असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे. गतवर्षी जानेवारीत खेड, गुहागर, संगमेश्‍वर आणि लांजा या तालुक्यांतील पाणी पातळी घटली होती. यंदा राजापूर वगळता सर्वच तालुक्यांतील पातळी कमी झाली आहे.

Water Shortage
Water Level : मराठवाड्यात भूजल पातळी सर्वच तालुक्यांत वाढली

बंधारे बांधून पाणी साठवा

पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सिमेंट बंधारे, समतोल पाणलोट विकास, तलावातील गाळ काढणे, ओढ्यावर हंगामी बंधारे, जुन्या विहिरींची खोदाई या उपाययोजनांवर भर दिला आहे. गावातील जुने जलस्रोत दुर्लक्षित आहेत.

लोकसहभागातूनच कच्चे बंधारे उभारून पाणी स्रोतांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे.

पाणीपातळीची स्थिती (मीटरमध्ये)

तालुका - पाच वर्षांची सरासरी - जानेवारी - पातळीतील घट/वाढ

मंडणगड २.५२ २.६६ - ०.१४

दापोली ३.६१ ३.८७ - ०.२६

खेड २.८३ २.९५ - ०.१२

चिपळूण ३.९० ३.९७ - ०.०७

गुहागर ७.६४ ७.६९ - ०.०५

संगमेश्वर ६.५५ ६.६१ - ०.०६

रत्नागिरी ८.३९ ८.४८ - ०.०९

लांजा ८.३२ ८.३४ - ०.०२

राजापूर ५.७३ ५.७३ - ०.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com