Heavy Rain : पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत अतिवृष्टी

पेठ तालुक्यातील पेठ व कोहोर महसूल मंडलांत हंगामातील १६१.३ मिमी अशी विक्रमी, तर जोगमोडी परिसरात १४२.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain In Dam Catchment Area) कायम आहे. जिल्ह्यातील १३ महसूल मंडलांत अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली आहे. त्यामध्ये पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत सर्वाधिक पाऊस आहे. शनिवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत पेठ तालुक्यात १५५.१ मिमी, सुरगाणा तालुक्यात १०३ मिमी त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ६६ मिमी पाऊस झाला. या भागांतील नदी, नाल्यांना पूर (Flood) आल्याने आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. तर धरण क्षेत्रात पाण्याची आवक (Water Flow Increased In Dam Area) वाढली आहे.

Heavy Rain
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

पेठ तालुक्यातील पेठ व कोहोर महसूल मंडलांत हंगामातील १६१.३ मिमी अशी विक्रमी, तर जोगमोडी परिसरात १४२.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दमणगंगा, नार-पार या पश्‍चिम वाहिन्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने भाताची खाचरे पाण्याने भरली आहेत. शेताचे बांध फुटले आहेत.

Heavy Rain
Rain Update : राज्यात कुठे झाला धुव्वांधार पाऊस?

पेठ तालुक्यातील उस्थळे गावातील पूल पाण्याखाली गेला. उस्थळे, हनुपंतपाडा, फणसपाडा एकदरे, वडपाडा, निरगुडे, शिंदे या गावांत पूरजन्य स्थिती आहे. त्यामुळे आदिवासी भागांतील बहुतांश वाड्या व पाड्यांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा व उंबरठाणा, मनखेड व बोरगाव मंडलांत जोरधारेने परिसर जलमय झाला आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातही त्र्यंबकेश्‍वर, वेळुंजे व हरसूल महसूल मंडलांत पावसाने जोर धरला होता. इगतपुरी तालुक्यातील धारगाव महसूल मंडलांत ८७ मिमी पाऊस झाला. इगतपुरी, घोटी, टाकेद, नांदगाव व वाडीवऱ्हे महसूल मंडलात पावसाचा जोर कायम राहिला.

दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर राहिला. ननाशी मंडलात १३६.८ मिमी पाऊस झाला. नाशिक शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्‍चिम भागांत मखमलाबाद, गिरणारे परिसरात जास्त पाऊस होता.

या महसूल मंडलांत अतिवृष्टी

महसूल मंडळ...पाऊस (मिमी)

उंबरठाना...१४२

बोरगाव...६७.८

मनखेड...१०१.५

सुरगाणा...१४२

मखमलाबाद...७०.३

ननाशी...१३६.८

धारगाव...८७.३

पेठ...१६१.३

जोगमोडी...१४२.८

कोहोर...१६१.३

त्र्यंबकेश्‍वर...६६.५

वेळुंजे...६६.५

हरसूल...६६.५

दोन दिवसांत ६ टक्के धरणसाठा वाढला

पश्‍चिम भागात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील धरणसाठा दोन दिवसांत ६ टक्क्यांनी वाढला आहे. तो ३२ टक्के इतका आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ५ टक्के अधिक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com