Silver Rate : चांदीच्या दरात साडेपाच हजारांची घसरण

आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद होते. त्याच अनुषंगाने होणारे विविध कार्यक्रमही सध्या नाहीत. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात सध्या शांतता आहे.
Silver Rate
Silver RateAgrowon

जळगाव : आषाढी एकादशीनंतर (Ashadhi wari) लग्नसराई बंद होते. त्याच अनुषंगाने होणारे विविध कार्यक्रमही सध्या नाहीत. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात (Gold Silver Market) सध्या शांतता आहे. महिनाभरात चांदीच्या दरात (Silver Rate) साडेपाच हजारांची, तर सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली. चांदीत गुंतवणूक (Investment In Silver) करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

२२ जूनला चांदीचा दर ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होतो. बुधवारी (ता. २०) हा दर ५७ हजार प्रतिकिलो होता, तर २२ जूनला सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर ५१ हजार रुपये होते. बुधवारी ५० हजार ७०० रुपये होते. दहा दिवसांपूर्वी ५९ हजारांचा दर असलेल्या चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण होऊन ते ५७ हजार प्रतिकिलोवर स्थिर आहेत.

Silver Rate
Vegetable : अभ्यासातून प्रगत केली भाजीपाला शेती

रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे फेब्रुवारीत सोने-चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मार्चमध्ये सोन्याच्या दरात दोन हजार ७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला.

Silver Rate
Vegetable : अभ्यासातून प्रगत केली भाजीपाला शेती

अक्षयतृतीयेला चांदीचा दर ६९ हजारांवर (प्रतिकिलो) होता. नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदी ६५ हजारांपर्यंत आली होती, तर सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मे रोजी सोन्याचा दर ५० हजार ६०० प्रतितोळा होता. चांदी ६१ हजारांवर होती.

२३ मे रोजी सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० वर गेले. तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. ३० मे रोजी सोने ५१ हजार ७०० रुपये, तर चांदी ६३ हजारांवर गेली. ११ जूनला सोने ५२ हजार, तर चांदीचे दर ६३ हजार ५०० रुपये होते. २० जूनला सोन्याचे दर ५१ हजार, तर चांदीचे ६२ हजार ५०० रुपये होते.

सोने, चांदीचे दर (जीएसटीविना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

११ जून--५२ हजार --६३ हजार ५००

१४ जून--५० हजार ९००--६२ हजार

१६ जून--५१ हजार २००--६४ हजार

२१ जून--५१ हजार ३००--६३ हजार ५००

२२ जून--५१ हजार--६२ हजार ५००

११ जुलै--५१ हजार २००--५९ हजार

१५ जुलै--५० हजार ७००--५७ हजार

२० जुलै--५० हजार ७००--५७ हजार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com