प्रसिद्ध कवी कमलाकर देसले यांचे निधन

प्रसिद्ध कवी, गझलकार कमलाकर आत्माराम देसले (वय ५९) यांचे मालेगाव (जि. नाशिक) येथे शुक्रवारी (ता.३) रात्री हृदयविकाराने निधन झाले.
प्रसिद्ध कवी कमलाकर देसले यांचे निधन
Kamlakar DesaleAgrowon

नाशिक : प्रसिद्ध कवी, गझलकार कमलाकर आत्माराम देसले (Kamalakar Desale) (वय ५९) यांचे मालेगाव (जि. नाशिक) येथे शुक्रवारी (ता.३) रात्री हृदयविकाराने (Heart Attack) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

झोडगे (ता. मालेगाव) येथील जनता विद्यालयाचे शिक्षक म्हणून देसले मागील वर्षीच निवृत्त झाले होते. संतांच्या अभंगावर ते प्रवचने व विविध शाळा-महाविद्यालयांत विविध विषयांवर व्याख्याने देत असत. शेती आणि मातीवर त्यांचे विशेष प्रेम होते. ‘सकाळ-ॲग्रोवन’मधून ‘मशागत’ हे स्तंभलेखन त्यांनी केले. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी कविता सादर केल्या होत्या.

साहित्य चळवळीत सहभागी होऊन लेखनातून आपली ओळख त्यांनी निर्माण केली होती. ‘काही श्‍वास विश्‍वासाठी’ हा त्यांचा कवितासंग्रहही त्यांनी लिहिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. (द्वितीय) अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश केला होता. तर पुणे विद्यापीठाच्या बीएच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले. देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. अलीकडेच त्यांचा ‘कसमादे गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रतिभा, मुलगे तुषार व ज्ञानेश्‍वर असा परिवार आहे.

झोडगे या मूळगावी शनिवारी (ता.४) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शैक्षणिक, कृषी, साहित्य, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या वेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com