वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

काटवन बीटमधील घटना, मृताच्या कुटुंबीयांना मदत
वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार
Tiger AttackAgrowon

मूल, चंद्रपूर : काटवन बफर जंगलक्षेत्रात शेतात काम करीत असलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. मृत शेतमजुराचे नाव रामभाऊ कारू मरापे (वय ४३) असे आहे.

१५ मे रोजी याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. काटवन बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांकावर ७५६ च्या जंगलाला लागून अनेकांची शेती आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतीकामासाठी राम मरापे हा शेतात गेला होता. तेव्हाच शेतालगतच्या जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने रामभाऊ मरापे यांच्यावर हल्ला करून ठार केले. त्याच्यासोबत असलेल्या काही मजुरांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांच्या नेतृत्वातील वनपथकात क्षेत्र सहायक जोशी, बीट वनरक्षक वासेकर, परचाके यांचा समावेश होता. मरापे याचा मृतदेह जवळच असलेल्या नाल्यालगत आढळला. गावकऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

वनविभागातर्फे मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ २५ हजारांची मदत देण्यात आली. हा संपूर्ण परिसर संपूर्ण जंगलव्याप्त आहे. या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर आहे. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी व शेतमजुरांना आपल्या पोटाच्या भाकरीसाठी शेतात जाणे भाग पडते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे जंगलव्याप्त गावात शेती करणे कठीण होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com