BRS KCR : शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे रविवारी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार

शंकरअण्णा धोंडगे मन्याड खोऱ्यातील शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.
Shankaranna Dhondge
Shankaranna DhondgeAgrowon

Nanded News : शेतकरी नेते, राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुख माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे तेलंगणा (Talgana) येथील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात रविवारी (ता. २६) प्रवेश करणार आहेत.

धोंडगे यांनी राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुखपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला.

शंकरअण्णा मन्याड खोऱ्यातील शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. शेतकरी नेते शरद जोशी, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशभर आंदोलने केली. कारावास भोगला.

शेती, सिंचन आणि शेतकरी याबाबत त्यांचा दांडगा अभ्यास पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांच्यावर राष्ट्रवादी किसान भारती, राष्ट्रवादी किसान सभेची जबाबदारी सोपवली.

Shankaranna Dhondge
Madhavrao More : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

अण्णांनीही राज्यभर दौरे करून राष्ट्रवादीच्या मागे शेतकऱ्यांची मोट बांधली. २००९ मध्ये पक्षाने त्यांना कंधारमधून विधानसभेची उमेदवारी दिली. पक्षाचे पाठबळ आणि शेतकऱ्यांची साथ याच्या बळावर ते प्रथमच आमदार झाले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांना विजय संपादन करता आला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवत चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले.

या निवडणुकीत त्यांच्या चिरंजीवांचा पराभव झाला. सातत्याने दोन वेळा पराभव झाल्याने ते राजकारणापासून अलिप्तच राहत होते. श्रेष्ठींनीही याची फारशी दाखल घेतली नाही.

राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुखपद त्यांच्याकडे नावालाच देण्यात आल्यासारखे होते. या सर्व बाबींमुळे शंकरअण्णा गेल्या चार ते पाच वर्षांपासून उदासीन होते. मधल्या काळात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी शंकरअण्णा यांची भेट घेऊन त्यांना ‘बीएसआर’ पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

Shankaranna Dhondge
कर्नाटकात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक

अण्णांनी केसीआर यांचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर शंकरअण्णांसह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे सादर केले.

यानंतर लोहा येथे रविवारी (ता. २६) तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत ते ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील काही बडे नेतेही ‘बीआरएस’ची वाट धरणार असल्याची सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com