Orange Farming : शेतकरी नियोजन : संत्रा

अमरावती जिल्ह्यातील काजळी (ता. चांदूरबाजार) येथील मयूर देशमुख यांच्या कुटुंबीयांची ४५ एकर शेती आहे.
Orange Farming
Orange FarmingAgrowon

अमरावती जिल्ह्यातील काजळी (ता. चांदूरबाजार) येथील मयूर देशमुख यांच्या कुटुंबीयांची ४५ एकर शेती आहे. त्यापैकी ३० एकरांवर संत्र्याची (Orange) सुमारे ४ हजार १०० झाडे आहेत. संपूर्ण लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर आहे. त्यातील १२०० झाडे २५ वर्षे वयाची, १३०० झाडे १२ वर्षे वयाची आणि १६०० झाडे २ वर्षे वयाची आहेत.

संत्रा लागवडीत (Orange Farming) सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही पद्धतींचा मध्य साधत बागेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी बागेतून एकरी साधारण १५ ते २० टन संत्रा उत्पादन मिळते. बागेत शेणखताचा दरवर्षी वापर केला जातो. जेणेकरून फळांचा दर्जा राखण्यास मदत होते. बागेतील सर्व झाडांवर आंबिया बहर धरला जातो. मयूर देशमुख यांना त्यांचे काका विनोद बाळकृष्णराव देशमुख आणि बंधू वेदांत देशमुख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

Orange Farming
Orange Export : संत्रा निर्यातीसाठी सवलत द्यावी

आगामी नियोजन

झाडावरील वाढलेल्या फांद्या (सल) कात्रीच्या साह्याने काढण्याची कामे सुरु आहेत. सल काढण्यासाठी वापरलेली कात्री वापरापूर्वी आणि नंतर निर्जंतुक केली जाते. वाळलेली सल, काड्या काढून जाळून नष्ट केल्या जातील. त्यानंतर खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाईल.

या वर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे बागेत तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या बागेस ताण दिला आहे. मात्र तणांमुळे झाडांना अपेक्षित ताण बसत नाही. त्यासाठी तणनाशकांची फवारणी करून तणनियंत्रण केले जाईल. त्यामुळे झाडांना अपेक्षित ताण बसण्यास मदत होईल.

तणनाशकांची फवारणी केल्यानंतर साधारण १० दिवसांनी सिंगल सुपर फॉस्फेट ४ पोती आणि सल्फर १०० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे मात्रा दिली जाईल.

रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर एकरी २ ट्रॉलीप्रमाणे शेणखत दिले जाईल. त्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने बागेत हलकी मशागत केली जाईल.

बागेला प्रामुख्याने पाटपाणी दिले जाते. मशागतीची कामे झाल्यानंतर झाडापासून काही अंतरावर वाफे तयार केले जातात. त्यामुळे झाडांचा पाण्याशी थेट संपर्क होत नाही. परिणामी, पाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण होते.

Orange Farming
Orange Market : संत्री दर दबावात

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी ४ विहिरी आणि ४ बोअरमधील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. बागेत सिंचनासाठी प्रामुख्याने पाटपाणी पद्धतीचा वापर केला जातो. नवीन संत्रा लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

बागेत एका रांगेत १४ झाडे असल्यास त्यातील पहिल्या झाडापासून बाराव्या झाडापर्यंतच पाटपाणी दिले जाते. त्यानंतर शेवटच्या दोन झाडांना आपोआपच ओलावा मिळतो. तसेच पाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रण मिळवणे शक्य होते, असा त्यांचा अनुभव आहे.

उत्पादन, विक्री नियोजन

फळे विक्रीयोग्य झाल्यानंतर व्यापारी बागेत येऊन जागेवरच फळांची खरेदी करतात. रासायनिक आणि शेणखताचा संतुलित प्रमाणात वापर केल्याने फळांचा दर्जा राखण्यास मदत होते. त्यामुळे दरही चांगला मिळतो. दरवर्षी अंबिया बहरातून एकरी साधारण १५ ते २० टन संत्रा फळांचे उत्पादन मिळते. मागील हंगामातील फळांस प्रतिकिलो साधारण २७ रुपये दर मिळाला, असे मयूररावांनी सांगितले.

- मयूर देशमुख, ९७६५०२०७०५

(शब्दांकन ः विनोद इंगोले)

Orange Farming
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

आंबिया बहराचे नियोजन

बागेतील सर्व झाडांवर आंबिया बहर धरला जातो. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन केले जाते.

मागील हंगामातील फळांची काढणी पूर्ण झाल्यानंतर बाग स्वच्छ केली जाते. बागेत पडलेली फळे, फांद्या गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते.

बागेतील सर्व झाडे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ताणावर सोडली जाते. हा ताण साधारण २५ डिसेंबरच्या दरम्यान पाटपाणी पद्धतीने सिंचन करत तोडला जातो.

ताण कालावधीत झाडावरील वाळलेल्या फांद्याची छाटणी केली. छाटणी करताना झाडांना जखमा होणार नाहीत याची काळजी घेतली. छाटलेल्या फांद्या बागेबाहेर त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर झाडाच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाते.

त्यानंतर रासायनिक खते आणि शेणखताच्या मात्रा दिल्या जातात. झाडाच्या परिघात रिंग पद्धतीने खतमात्रा दिल्या जातात. प्रति झाड सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो मात्रा दिली जाते. एकरी साधारण २ ट्रॉली शेणखत बागेस दिले जाते.

बागेत रासायनिक आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन पद्धतीचा मध्य साधत बागेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून बागेतील सेंद्रिय कर्ब वाढीस चालना मिळेल, असे मयूरराव सांगतात.

दोन वर्षे वयाच्या १६०० झाडांच्या नवीन संत्रा लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात.

नवीन लागवडीत कांदा आणि हरभऱ्याचे आंतरपीक घेतले जाते.

बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com