शेतकरी नियोजन: रेशीमशेती

प्रशांत यांनी २०१३ पासून रेशीमशेतीस सुरुवात केली. रेशीम शेतीकडे वळण्यापूर्वी पारंपरिक पिकांची (Traditional Crop) लागवड करायचे. गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीत मिळालेले आमूलाग्र यश पाहू त्यांनीही रेशीम उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
Sericulture
SericultureAgrowon

चनई (ता.अंबाजोगाई जि.बीड) येथील प्रशांत कदम यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरवर तुती लागवड (Sericulture) तर उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, गहू या पिकांची लागवड केली आहे.

प्रशांत यांनी २०१३ पासून रेशीमशेतीस सुरुवात केली. रेशीम शेतीकडे वळण्यापूर्वी पारंपरिक पिकांची (Traditional Crop) लागवड करायचे. गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीत मिळालेले आमूलाग्र यश पाहू त्यांनीही रेशीम उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यातून २०१३ रोजी दीड एकरावर तुतीच्या व्ही-१ वाणाची दोन ओळीत ४ फूट आणि दोन झाडांत १ फूट अंतर राखत लागवड केली आहे.रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी ६० बाय २२ फूट आकाराचे संगोपनगृह देखील उभारले. तुती लागवडीत सिंचनासाठी बोअरवेलमधील पाण्याचा वापर केला जातो.

तुती बागेचे व्यवस्थापन ः

- यंत्राच्या साह्याने तुती बागेची १५ ते २० मे या काळात छाटणी केली.

- छाटणीनंतर दीड एकरास साधारण २० ते २५ गाड्या शेणखताची मात्रा दिली. तसेच १२ः३२ः१६ हे खत ५० किलो डीएपी खत ५० किलो आणि युरीया २५-३० किलो प्रमाणे रासायनिक खते दिली.

- त्यानंतर रोटर मारून आंतरमशागत केली. आंतरमशागत केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव सध्यातरी दिसत नाही.

संगोपनगृहाचे व्यवस्थापन ः

- रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी ६० बाय २२ फूट आकाराचे संगोपनगृह उभारले आहे.

- एका बॅचमध्ये २५० ते ३०० अंडीपुंजांपासून २०० ते २५० किलो कोष उत्पादन मिळते.

- संगोपनगृहात २ मोल्ट पास झालेली म्हणजेच १० दिवसांचे बाल्य कीटक आणले जातात.

- एका बॅच साधारण २१ दिवसांची असते.

- कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर वापरून शेड पूर्णपणे निर्जंतुक केले जाते.

- प्रत्येक बॅच गेल्यानंतर ७ दिवसांचे अंतर ठेवले जाते. याकाळात निर्जंतुकीकरण, चॉकीची उपलब्धता केली जाते.

- कोष काढणी आणि चॉकी गेल्यानंतर फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांद्वारे संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाते.

- रेशीम कीटकांचे व्यवस्थापन हे काटेकोर पद्धतीने करावे लागते. अन्यथा, विविध प्रकारचे रोग येण्याची शक्यता असते. परिणामी, पूर्ण बॅच बाद होण्याची धोका असतो.

उत्पादन, विक्री ः

- एका बॅचमध्ये साधारण २ ते अडीच क्विंटल कोष उत्पादन मिळते. त्यास प्रतिकिलो साधारण ४०० ते ५०० किलो दर मिळतो.

- सुरुवातीच्या काळात उत्पादित कोषाची विक्री बंगळूर जवळील रामनगरम बाजारपेठेत केली जात असे. मात्र, मागील काही वर्षांत मुरूड किंवा बीड येथील स्थानिक बाजारपेठेत कोषाची विक्री केली जाते.

शेतकरी ः प्रशांत पंडितराव कदम

गाव ः चनई ता.अंबाजोगाई जि. बीड.

एकूण शेती ः ४ एकर

तुती लागवड : दीड एकर

- प्रशांत कदम, ९९२१४६३८१४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com