Onion Rate : धामणगावला कांदा पिकात सोडल्या शेळ्या

सातत्याने भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश होत चालला आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon

Nashik News : जिवापाड जपलेल्या कांद्याला कवडीमोल भाव (Onion Rate) मिळत असल्याने गुंतवलेले भांडवल तर दूरच पण कांदा (Onion Market) विकायला बाजार समितीत देण्यासाठी महाग झाला आहे.

यामुळे धामणगाव येथील शेतकऱ्याने कांद्याचा काढणीचा (Onion Harvesting) खर्च मिळणाऱ्या भावात परवडणारा नसल्याने एक एकराच्या कांदा पिकात चरण्यासाठी मेंढ्या सोडून देत आपला संताप व्यक्त केला.

कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सातत्याने भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश होत चालला आहे. जिल्ह्यात कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांची भिस्त त्याच्यावरच असते.

Onion Rate
Onion Rate : आठ क्विंटल कांदा विक्रीतून उरला केवळ एक रुपया

कांदा पिकावर रोटर फिरविण्याचा प्रकार निफाड तालुक्यातील नैताळे येथे सोमवारी (ता. २७) घडलेला असताना नगरसूल येथेही कांद्याला अग्निडाग देण्याचा समारंभ सहा मार्चला कृष्णा डोंगरे यांनी ठेवला आहे. कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांत नैराश्याची भावना निर्माण होत चालली आहे.

रास्ता रोको, लिलाव बंद पाडलले जात आहेत. कांदा काढणीला साडे सात हजार रुपये खर्च लागणार असल्याने हतबलतेतून धामणगाव येथील दादा गुळवे यांनी आपल्या उभ्या कांदा पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या.

Onion Rate
Onion Rate : आठ क्विंटल कांदा विक्रीतून उरला केवळ एक रुपया

कांद्याला २०० रुपये क्विंटल नीचांकी भाव मिळत असल्याने काढणीचा खर्च जास्त व उत्पन्न कमी असे विचित्र गणित झाले आहे. मेंढ्यांचे तरी पोट भरून लक्ष्मीचा आशीर्वाद सरकारला मिळेल, अशा अनोख्या पद्धतीने या शेतकऱ्यांने राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

सरकारने केवळ युक्तिवाद करून कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची चेष्टा करू नये. शेतात दहा रुपये गुंतवले तर प्रत्यक्षात पाच रुपये मिळणेही मुश्किल झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कांद्याला एकरी दोन हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील.
डॉ. मोहन शेलार, माजी गटनेते, पंचायत समिती, येवला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com