Farmer Income : शेतकऱ्यांना होतो डिजिटल बँकिंगचा फायदा : केंद्रीय कृषीमंत्री

देशातील आठ कोटी लोकांना ५ किलो धान्य देण्यासाठी केंद्रसरकारने ३ लाख ९० हजार कोटी निधी वापरला आहे. त्यासोबतच खरीपातील पिकांसाठी केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढही केली आहे, असे केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले.
Narendra Tomar
Narendra TomarAgrowon

डिजिटल पेमेंटमुळे (Digital Payment) शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer Account) थेट पैसे जमा होतात, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी गुरुवारी (ता.२२) सांगितले. ते दिल्ली येथील आयोजित एका परिषदेत बोलत होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 'एक राष्ट्र-एक रेशन कार्ड योजना यशस्वी ठरली आहे. या योजने अंतर्गत देशातील ५ लाख रेशन दुकानांमध्ये मशिन बसवण्यात आले. रेशन दुकानाचे जाळे देशात मोठे आहे. त्यातून सर्वसामान्य लोकांना रेशन वाटप केली जाते. मात्र आता या योजनेतील गैरव्यवहार थांबला आहे." असेही तोमर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, " जेव्हा दिल्लीतील एखादी व्यक्ती रेशन कार्डचा वापर अहमदाबादमध्ये करत असेल तर त्याला अडचण येऊ नये याची काळजी या एक राष्ट्र एक रेशन कार्ड द्वारे घेण्यात येत आहे. जर एखाद्या रेशन दुकानात धान्य मिळाले नाही तर दुसऱ्या दुकानात जाऊन रेशन खरेदी करू शकता. अशाच प्रकारचा फायदा या योजनेमुळे सामान्यांना झाला आहे.

Narendra Tomar
Farmer Incentive Scheme : नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

सरकारच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी डिजिटल साधनांचा उपयोग होत आहे. त्यामुळे देशातील आठ कोटी लोकांना ५ किलो धान्य देण्यासाठी केंद्रसरकारने ३ लाख ९० हजार कोटी निधी वापरला आहे. त्यासोबतच खरीपातील पिकांसाठी केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढही केली आहे, असे केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले.

दरम्यान देशातील यंदा उसाचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेता भारत जगातील साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास येईल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री तोमर यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com