MIDC Project : एमआयडीसी प्रकल्पाविरोधात उरणच्या शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Uran MIDC : एमआयडीसी प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील सारडे, वशेणी, पुनाडे येथील जमिनींची मोजणी केली जाणार आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
MIDC Project
MIDC ProjectAgrowon

MIDC Project In Uran : एमआयडीसी प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील सारडे, वशेणी, पुनाडे येथील जमिनींची मोजणी केली जाणार आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील सुपीक जमिनी लॉजिस्टिक वापरासाठी अदानी ग्रुपच्या ब्ल्यू स्टार कंपनीच्या गळ्यात घालण्याचा डाव केंद्र व राज्य सरकारचा आहे.

यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. एमआयडीसीच्या भू संपादनाला येथील शेतकऱ्यांचा शेवटपर्यंत विरोध असेल, अशी आक्रमक शुक्रवारी (ता. १९) शेतकऱ्यांनी घेतली.

पनवेल येथील प्रांत दालनात उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १९) उरण तालुक्यातील सारडे, वशेणी, पुनाडे येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसी प्रकल्पासाठी जमीन मोजणीला असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.

MIDC Project
MIDC Registration : सात-बारा उताऱ्यावरील ‘एमआयडीसी’ची नोंद अखेर रद्द

या बैठकीसाठी एमआयडीसीचे अधिकारी, उरणचे आमदार महेश बालदी उपस्थित होते. जमिनीचा निर्धारित भाव काय देणार, बेस रेट कसा ठरवणार, विस्तारित गावठाणातील घरे कायम करण्यासाठी धोरण काय?, याबाबतीत ठोस उत्तर एमआयडीसीचे अधिकारी देऊ शकले नाहीत.

शेतकऱ्यांनी नैसर्गिक वाढीपोटी आपल्या खासगी जागेत बांधलेली घरे सरकार अनधिकृत ठरवत असेल, तर आमचा याला पूर्ण विरोध असेल. या विभागातील सुपीक जमिनी घेण्याऐवजी एसईझेडमधील जमिनी, सीआरझेडच्या जमिनी, ओसाड व पडीक जमिनी एमआयडीसीने संपादित करून अदाणीच्या घश्यात घालाव्यात, अशी भावना संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

एकजुटीने हद्दपार करू

सर्व शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता एमआयडीसीसाठी होणारी जमीन मोजणी तूर्तास मागे घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला एक पाऊल मागे जावे लागले.

अंबानीच्या एसईझेडला जसे एकत्र येऊन हद्दपार केले, त्या पद्धतीने सारडे, वशेणी, पुनाडे गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उरणमध्ये सरकारच्या माध्यमातून भूसंपादन करणाऱ्या अदाणी समूहाच्या ब्ल्यू स्टारला हद्दपार करू, या असे आवाहन सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com