
Chhatrapati Sambhajinagar : कृषी विज्ञान केंद्र वाशीम येथील उद्यान विद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अति आधुनिक अशा अति घन लागवडद्वारे उभ्या असलेल्या आंबा बागांचा अभ्यास दौरा (Study tour of mango orchards) आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यामध्ये तीन जिल्ह्यांतील ६५ शेतकरी सहभागी झाले होते.
सुरुवातील अजिंठा जवळील मुखपाट येथील अशोकराव सूर्यवंशी यांनी अतिशय खडकाळ जमिनीत उभी केलेल्या केसर आंबा बागेची पाहणी करण्यात आली. बागेच्या लागवडीविषयी अंतराविषयी सर्व माहिती श्री. सूर्यवंशी आणि विश्वजित सूर्यवंशी यांनी दिली.
त्यानंतर सौ. आरती थोरात यांची पंधरा एकर वरील पाच बाय दहा मीटर वर लागवड केलेली वीस वर्षांपूर्वीची बाग फळाने लगडलेली झाडे, तसेच फळांची पाहणी केली. त्यानंतर नाथ सीड कंपनीच्या सहा लाख कलम तयार असलेली रोपवाटिका पाहिली.
कलमाची इथंभूत माहिती नाथ सीडचे व्यवस्थापक रसूल शेख यांनी दिली. त्याचबरोबर श्री. शेख यांनी नाथ सीड कंपनीची विसरवाडी येथील नूतनीकरण केलेली ५० एकर वरील केसर आंबा बाग दाखवली.
वडावळी येथील महाकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे यांच्या आधुनिक आशा तीन वर्षांच्या अति घन केसर आंबा बाग पहिली. या बागेतील अति उत्तम क्वालिटीचे त्याचबरोबर बँकिंग केलेली फळधारणा शेतकऱ्यांना आकर्षित केली करून गेली. या वेळी श्री. काळे व श्याम काळे यांनी बागेच्या मशागती विषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
श्री. काळे यांच्या शेतातच चर्चासत्र झाले. त्यामध्ये श्री. काळे यांनी बागेविषयी, तसेच महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या कार्याविषयी माहिती दिली.
डॉ. कापसे यांनी अति घन लागवड करून विदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा आंबा बागेतून आर्थिक लाभ मिळवता येऊ शकेल. त्यासाठी मग जमीन कशी असावी पाण्याची व्यवस्था कशी असावी, आंतर व लागवडी बाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रकाश कापसे, विकास कापसे, आकाश शेळके इत्यादी मंडळींनी सहकार्य केले. शेवटी आभार कारंजा येथील मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.