
Roha News : कोलाड विभागातील पुगाव हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना एमआयडीसी महामंडळाकडून सव्वा कोटी रुपये नुकसान भरपाई (Compensation) मंजूर झाली आहे.
कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजवा तीर कालव्याच्या पाणीगळतीतून पुगाव हद्दीतील शेकडो एकर भातशेती (Paddy Farming) नापिक झाली आहे.
त्या जमिनीत कोणतेच पीक घेता येत नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडून भरपाई मिळाली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी सरकार दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
अनेक कंपन्यांना कोलाड पाटबंधारे विभागाचे पाणी मोठ्या प्रमाणात जलवाहिनीतून जाते. या जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन कायम ओलिताखाली राहते.
त्यातीलच कुंडलिका उजवा तीर कालव्याच्या गळतीतून भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २०१८ ते २०२१ वर्षासाठीची नुकसान भरपाई म्हणून तब्बल १ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
विभागातील कालव्याच्या पाणी गळती बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपये रकमेची फाईल एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी शेतकऱ्यांकडे सुपूर्द केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रमोद मस्कर, नारायण धनवी, सुधीर शेळके, घनश्याम बागुल आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.