Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना मिळाली ११ लाख रुपयांची भरपाई

शहरालगत औद्योगिक क्षेत्र-२ वीजनिर्मिती केंद्र या कंपन्यांना एकोणा कोळसा खदान येथून कोळसा पुरविला जातो.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Chandrapur News : कोळसा वाहतुकीमुळे (Coal Transport) रस्त्यालगच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले होते. शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून शेतकऱ्यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर २३ शेतकऱ्यांना ११ लाखांची भरपाई मंजूर करण्यात आली.

वरोरा तालुक्‍यातील चरुरखटी नायदेव या रस्त्याने एकोणा कोळसा खाणीतून जीएमआर कंपनीमध्ये कोळसा वाहतूक केली जाते. या वाहतुकीमुळे रस्त्यालगत असणाऱ्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोड यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निवेदन दिले होते. त्यासोबतच एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावाही चालविला होता.

Crop Loan
Crop Damage : बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांना देखील या बाबत निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रशासकीय कामाला वेग आला. अखेर नुकसानग्रस्त २३ शेतकऱ्यांना ११ लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेश देण्यात आले.

शहरालगत औद्योगिक क्षेत्र-२ वीजनिर्मिती केंद्र या कंपन्यांना एकोणा कोळसा खदान येथून कोळसा पुरविला जातो. नियमबाह्य केल्या जाणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे चरुरखटी नायदेव रस्त्यालगत असणाऱ्या शेतीचे नुकसान होत आहे.

याबाबत वरोरा तहसीलदारांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. निवेदनाची दखल न घेतल्याने व समस्या ‘जैसे थे’ असल्याने शेतकऱ्यांनी शिवसेना (ठाकरे गट) कार्यालय गाठले. जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासमोर आपली समस्या मांडली.

त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून याप्रकरणी पाठपुरावा करण्यात आला. आदेशानंतरही कंपनीकडून धनादेश देण्यात आला नाही. ही बाब जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com